श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पुजन……
श्री संत नरहरी महाराज यांच्या ७३९ व्या पुण्यतिथी निमित्त दि नाशिकरोड सराफ असोसिएशन वतीने प्रतिमा पुजन करण्यात आले. श्री संत नरहरी महाराज हे 13व्या शतकातील वारकरी पंथाचे कवी-संत होते.
संत नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील प्रथम शैव उपासक होते. पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला.
देवी चौकात असोसिएशन च्या वतीने कार्यक्रम संपन्न झाले.
श्री संत नरहरी महाराजांची आरती नगरसेविका डॉक्टर सीमा ताजने, मित्रमेळाचे कन्नू ताजणे, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर, राजेंद्र मोरे, विलास थोरात श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्थेचे समितीचे अध्यक्ष डॉ. साहिल उदावंत, कार्याध्यक्ष शैलेंद्र उदावंत, सेक्रेटरी संजय पितळे, भगवान लोळगे, योगेश नागरे, गिता नवसे, सोनु नागरे, किरण डहाळे आदी मान्यवरांच्या हस्ते आरती व प्रतिमा पुजन झाले. त्यानंतर असोसिएशनच्या वतीने मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
नाशिक रोड सराफ अध्यक्ष राहुल बाळासाहेब महाले, उपाध्यक्ष योगेश शेगावकर ,राहुल मसे ,कृष्णा मसे योगेश नागरे, प्रकाश काजळे, किरण कुलथे, कैलास शहाणे ,मंगेश टाक ,संतोष बेंद्रे, संदीप उदावंत ,रवी उदावंत, राजू नागरे, दीपक नागरे ,निलेश आहेर राव ,अमोल जंगम ,मंगेश पोतदार ,रवी महाले, राम महाले आदींनी आयोजन करण्यासाठी परिश्रम घेतले.
पुण्यतिथी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर साहिल सावंत संदीप उदावंत महिला अध्यक्ष गीता ताई नवसे, किरण डहाळे, शरद उदावंत, गोपाळशेठ कुलथे, इमाम शेख हसन शेख, सादिक शेख,
तन्मय घाडगे, राहुल शेगावकर,पाटील, पाटणे वाले,विजय गोल्ड, सोमनाथ मोरे, संतोष गाडेकर, सुहास लिंगायत, शशिकांत लोखंडे, जयश्री तारसे आदी मान्यवर उपस्थित होते.