Homeताज्या बातम्यासिंधी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा नाशिक सिंधी पंचायती तर्फे आयोजित गुणगौरव पुरस्कार समारंभ...
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

सिंधी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा नाशिक सिंधी पंचायती तर्फे आयोजित गुणगौरव पुरस्कार समारंभ संपन्न

सिंधी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा नाशिक सिंधी पंचायती तर्फे आयोजित गुणगौरव पुरस्कार समारंभ संपन्न…..

कोणतेही शिक्षण घेत असलेली व्यक्ति म्हणजे विद्यार्थीच आहे. विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहेच तसेच विद्यार्थी प्रगती साठी प्रलोभन म्हणून बक्षीस हे सुद्धा महत्वाचे आहे म्हणून सन्मानाचा बहुमान स्वीकारल्यासारखा सुखद अनुभव दुसरा नाही. यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे. उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेजच यश गुरुवार १९ जुलै रोजी अशाच विद्यार्थ्यांना बक्षिस देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी नाशिक सिंधी पंचायती तर्फे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

इयत्ता दहावी, बारावीच्‍या परीक्षेत तसेच अन्‍य विविध परीक्षांमध्ये यशस्‍वी कामगिरी करणार्या सिंधी समाजातील एकूण ९२ विद्यार्थ्यांचा सत्‍कार करण्यात आला. यावेळी परीक्षेत ७५ टक्‍यांहून अधिक गुण मिळविलेल्‍या दहावीतील ७० हून अधिक तर बारावी २२ हून अधिक विद्यार्थ्यांना सिंधी गौरव पुरस्‍काराने गौरविण्यात आले.

सन्‍मानचिन्‍ह व प्रमाणपत्र प्रदान करत विद्यार्थ्यांच्‍या पाठीवर कौतुकाची थाप मारली विद्यार्थी गुण गौरव पुरस्कार समारंभ चंद्रदर्शन या पवित्र दिवशी तपोवन रोड वरील रामी भवन हॉल झुलेलाल सभगृहात मोठ्या उत्साहात पार पडले. सर्व प्रथम सिंधी समाजाचे कुलदैवत भगवान झुलेलाल यांची महाराज विजय सेतपाल यांच्या हस्ते विधिवत पूजा करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सिंधी समाजातील ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय सायकलिंगच्‍या स्‍पर्धेत भारताचे नाव सातासमुद्रापार फडकविणार्या शिया लालवाणी हिचा विशेष सत्‍कार करण्यात आला.

कार्यक्रमाप्रसंगी नाशिक सिंधी पंचायतीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आहुजा, उपाध्यक्ष श्‍याम मोटवानी, अशोक पंजवानी, नंदू करमचंदानी, सुनिल केसवानी, शंकर जयसिंघानी, भगवान मोटवानी,हासानंद करमचंदानी, हेमंत भोजवानी, सतीश पंजवानी, मनोहर जयसिंगांनी, हेमंत पमनानी, कन्हैयालाल कलानी, अशोक पंजाबी, ओमप्रकाश काच्छेला,महेश पंजवानी, महेश नागपाल, प्रकाश मनवानी, कनैय्यालाल कालानी, मनोहर कारडा, योगेश दंडवानी, रमेश दंडवानी, हेमंत तारानी, महेश वालेचा, ॲड.ज्‍योती आहुजा, ॲड.भारती कटारिया, कोमल पंजवानी, प्रिया साधवानी, योगिता करमचंदानी, ज्‍योती मोटवानी,आदी मान्‍यवर उपस्‍थित होते.

गुणवंतांना सिंधी गौरव पुरस्‍कार प्रदान धार्मिक कार्यक्रमास नाशिक शहरासह उपनगर, जेलरोड, नाशिकरोड व देवळाली कॅम्‍पहूनही कार्यक्रमात समाज बांधव सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित भाविकांसाठी भव्य भंडारा चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्‍या पाठीवर कौतुकाची थाप दिल्‍याने त्‍यांना त्‍यांचे करिअर करण्यासाठी प्रोत्‍साहन मिळते त्‍यामुळे दरवर्षी सत्‍कार समारंभाचे भव्‍य स्‍वरुपात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याचे नाशिक सिंधी पंचायतीचे अध्यक्ष एडविकेट प्रकाश आहुजा यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments