सिटी सेंटर मॉल येथे दहशतवादी हल्ल्याच्या पार्शवभूमीवर मॉकड्रिल…..
दहशतवादी हल्ला झाल्यास पोलीस व संबधीत आस्थापना यांची तयारीची पडताळणी करण्यासाठी मॉक ड्रिल घेण्यात आली. नाशिक शहरातील सिटी सेंटर मॉल येथे दहशतवादी हल्ला झाल्यास कशाप्रकारे पोलिसांतर्फे कारवाई केली जाईल यासाठी सराव करण्यात आले. यावेळी मॉल परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.
या मॉकड्रील मध्ये शहर पोलीस, ATS, QRT, बॉम्बशोधक पथक यांनी सहभाग घेतला होता. मॉकड्रिल दरम्यान पोलीस उप आयुक्त चव्हाण, पोलीस उप आयुक्त बच्छाव, गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, कोल्हे, गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त वाघ यांच्यासह पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
सदर मॉक ड्रिल नंतर पोलीस उप आयुक्त चव्हाण यांनी सिटी सेंटर मॉल येथील सिक्युरीटी अधिकारी व कर्मचारी यांना सुरक्षते बाबत सुचना दिल्या
नागरिकांनी अशी घटना प्रत्यक्ष घडल्यास अफवांना बळी न पडता पोलीस सांगतील ती माहिती खरी समजावी असे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.