Homeक्राईमआधार पेमेंट व्दारे लाखो रूपयांची ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी जेरबंद ..... तीन...
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

आधार पेमेंट व्दारे लाखो रूपयांची ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी जेरबंद ….. तीन संशयितांना अटक नाशिक ग्रामीण सायबर पोलीसांची कामगिरी…….

नांदगाव पोलीस ठाणे हद्दीतील पळाशी गावामधील काही नागरीकांचे बँक खात्यांवरून ऑनलाईन फसवणूकीव्दारे संमतीशिवाय अपरोक्ष पैसे काढून घेतले जात होते. याबाबत नागरीकांनी संबंधीत बँक मॅनेजर यांचेकडे तक्रार केली असता, त्यांना समर्पक माहीती न मिळाल्याने त्यांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय येथे तक्रार केली होती. नाशिक ग्रामीण सायबर पोलीसांनी तात्काळ दखल घेवून चौकशी केली असता, पळाशी, ता. नांदगाव येथील सुमारे १५ लोकांचे AEPS ( आधार ईनेबल पेमेंट सिस्टीम) सेंटर येथून अंगठयाचे ठशांव्दारे परस्पर आनलाईन पैसे काढून घेतले असल्याबाबत माहीती मिळाली. सायबर पोलीस ठाण्यात भादवि कलम ४२० सह आय टी ॲक्ट ६६ क, ६६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हयात अज्ञात इसमांनी पळाशी गावातील नागरीकांचे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बेहळगाव, ता. नांदगाव येथील खात्यांमधून संमतीशिवाय आर्थिक फसवणूक करण्याचे इराद्याने एकूण २,६६,७९९/- रूपये कुठल्यातरी AEPS ( आधार इनेबल पेमेंट सिस्टीम) सेंटर येथून अंगठयाचे ठशांव्दारे पैसे काढून घेतले म्हणून समाधान संजय घुगे, रा. पळाशी, ता. नांदगाव यांनी फिर्याद दिली होती. याप्रकरणी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांचा तपास सुरू होते. त्यानुसार नाशिक ग्रामीण सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिपक देसले व पोलीस अंमलदारांनी वरील प्रकरणातील AEPS (आधार ईनेबल पेमेंट सिस्टीम) सेंटर बाबत तांत्रिक विश्लेषणाव्दारे माहीती काढून चाळीसगाव तालुक्यातून संशयित किशोर लक्ष्मण सोनवणे, वय २१, रा. उपखेडा, ता. चाळीसगांव, जि. जळगांव, रविंद्र विजय गोपाळ, वय २३, रा. बानगांव, ता. चाळीसगांव, जि. जळगांव, व सोमनाथ काकासाहेब भोंगाळ, वय २३, रा. बानगांव, ता. चाळीसगांव, जि. जळगांव यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

यातील आरोपी किशोर सोनवणे हा प्रधानमंत्री ग्रामीण डिजीटल साक्षरता अभियान अंतर्गत ऑनलाईन परिक्षांचे रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याचे काम करत होता. सध्या तो धुळे येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात कॉम्प्युटर इंजिनियरींगचे शिक्षण घेत आहे. तसेच त्याचे दोन्ही साथीदार रविंद्र व सोमनाथ हे सध्या चाळीसगांव येथील आधारसेवा केंद्रावर काम करत होते. त्यांचेकडे अधिक तपास केला असता, त्यांनी माहे जानेवारी २०२३ मध्ये नांदगाव तालुक्यातील पळाशी व वेहेळगाव येथे आधारकार्ड अपडेशन कॅम्प घेतला होता. सदर कॅम्पमध्ये उपस्थित नागरीकांचे बायोमॅट्रीक फिंगर स्कॅनरव्दारे अंगठयांचे ठसे घेण्यात आले होते. यातील आरोपींनी नागरीकांचे अंगठयांचे ठशांचा डाटा संकलीत करून त्याव्दारे CSC Digipay ऑनलाईन मनी ट्रान्सफर सव्र्हस अॅपमध्ये नागरीकांचे ठशांचा वापर करून संबंधीतांचे बँक खात्यांवरून परस्पर पैसे काढून घेतले असल्याबाबत कबुली दिली आहे. सदर आरोपींचे कब्जातून लॅपटॉप, मोबाईल स्मार्टफोन, फोर फिंगर स्कॅनर मशिन, आयरीस मशिन असे साहीत्य जप्त करण्यात आले आहे. आरोपींनी अलिशान जीवन व मौज-मजेसाठी सर्वसामान्य नागरीकांची ऑनलाईन फसवणूक करून पैसे काढले असल्याचे तपासादरम्यान कबुल केले आहे.

शासनमान्य आधारसेवा केंद्रावर जाऊनच आपली आधार संबंधीत माहीती अद्यावत करावी. कोणीही इसम अशाप्रकारे अनाधिकृत आधार अपडेशन कॅम्प घेत असेल तर नजीकचे पोलीस ठाणेशी तात्काळ संपर्क करावा.
आरोपींना वरील गुन्हयात अटक करण्यात आली असून मा. न्यायालयाने त्यांची ०३ दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सत्यजित आमले यांचे पथक करीत असून तपासाअंती यातील आरोपींकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदर गुन्हयाचे तपासात सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यजित आमले, सहायक पोलिस निरीक्षक सुनिल पाटील, सारीका चौधरी, पोलिस उप निरीक्षक दिपक देसले, बिपीन चौधरी, प्रमोद जाधव, परिक्षित निकम, चापोहवा डि.बी. बागुल, पोना नितीन करंडे, प्रदिप बहिरम, हेमंत गिलबिले, पोकॉ सुनिल धोकट, आकाश आंबोरे, तुषार खालकर, मपोका माधुरी जाधव यांच्या पथकाने सदरची कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments