शालेय जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत अनुष्का गोसावी ला सुवर्णपदक….
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक व जय भवानी व्यायाम शाळा, मनमाड यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय जिल्हास्तर वेटलिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेत गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील कला,वाणिज्य आणि विज्ञान(बिटको) कनिष्ठ महाविद्यालय मध्ये इयत्ता ११ वीत शिकत असलेल्या कु.अनुष्का गोसावी हिने क्लीन आणि जर्क मध्ये ४४ किलो वजन उचलून स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले आहे. तसेच तिची पुढे होणाऱ्या शालेय विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे .
तिला क्रीडाशिक्षक श्री. महेश थेटे यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या सुयाशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी यासह महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी, उपप्राचार्या सौ. सुनिता नेमाडे , पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.