Homeताज्या बातम्याछत्रे हायस्कूल माजी विद्यार्थ्यांचा २१ वर्षानंतर मेळावा संपन्न
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

छत्रे हायस्कूल माजी विद्यार्थ्यांचा २१ वर्षानंतर मेळावा संपन्न

छत्रे हायस्कूल माजी विद्यार्थ्यांचा २१ वर्षानंतर मेळावा संपन्न …..

मनमाडच्या छत्रे हायस्कूल माजी इ.10 वी वर्ष 2003 च्या विद्यार्थ्यांचा भरला 21 वर्षांनी मेळावा संपन्न झाले.मनमाड शहरातील श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित छत्रे न्यू इंग्लिश स्कूल या शाळेच्या 2002-2003 वर्षाच्या इ.10 वी वर्गाच्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेह संमेलन मेळावा रविवार 18 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे नियोजन करीत कार्यक्रम संपन्न केले.

यावेळी कार्यक्रमासाठी शिक्षकांना देखील निमंत्रित करण्यात आले होते. माजी विद्यार्थ्यांच्या 21 वर्षांनी भरलेल्या गेट-टुगेदर म्हणजे स्नेह संमेलनात
जमा रक्कमेतून अनाथ मुलांना खाऊ, कपडे तसेच खेळाचे साहित्य भेट म्हणून देऊन विविध सामाजिक उपक्रम करण्यात आले.स्नेह संमेलनाचा कार्यक्रम साई ऍक्वा पार्क हॉटेल, येवला रोड, मनमाड येथे आयोजित कार्यक्रमासाठी 80 हून अधिक माजी विद्यार्थी हजर होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दिनेश धारवडकर सर होते. मुख्याध्यापक थोरात सर, मा.मुख्याध्यापक पवार सर, सौ.पवार मॅडम, पंचवाघ सर, झांबरे सर, सौ.झांबरे मॅडम, चांदवडकर मॅडम, श्रीमती.पोदार मॅडम, सौ.एस.पी.देशपांडे मॅडम सर्व शिक्षकांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सर्व शिक्षकांचे गुलाब पुष्प, शाल व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळे नंतरचा प्रवास आपला अल्प परिचय थोडक्या शब्दात देत मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती.कामिनी ठोकेंनी आपल्या सुंदर शैलीत केले. उपस्थित सर्व शिक्षकांनी आपले मनोगत व मोलाचे मार्गदर्शन करत, आपल्या शब्दातून कौतुकांची थाप सर्व माजी विद्यार्थ्यांनावर व्यक्त केली. व सर्वांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या! याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना शाळेच्या दिवसांच्या गमती जमती सांगताना सर्व माजी विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले होते. कार्यक्रमाची प्रस्ताविक माजी विद्यार्थी शैलेश सोनवणेंनी केले. तसेच सोमनाथ काळे, प्रवीण निकुंभ, योगिता डांगरे, राहुल गायकवाड, विकी वाघ, उज्वला बंस्ववांल, महेश पाटील, राकेश कराड, स्वप्नील वाणी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन श्रीमती.योगिता शंकर मोरें यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या दिवंगत शिक्षकांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून सर्वांनी श्रद्धांजली वाहीली.माजी विद्यार्थी असलेले सोमनाथ काळे हे सध्या पोलीस खात्यात सहायक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी स्वखर्चातून रक्षाबंधना निमित्त आलेल्या सर्व महिलांना पर्स भेट म्हणून दिली. तसेच राहुल गायकवाड यांनी विशेष अर्थ सहाय्य देत कार्यक्रमासाठी मदत केली.

कार्यक्रम स्थळी नाश्ता व दुपारच्या स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व जुन्या आठवणींना उजाळा देत सर्व शिक्षक व माजी विद्यार्थ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. 21 वर्षांनी भेटल्याने सर्व आनंदात चेहऱ्यावर दिसून येत होते. या वेळेस सगळे आपला वर्ग विसरून एकमेकाचे मित्र झाले आणि सोबत सेल्फी, ग्रुप फोटो, भेटीगाठी घेण्यात मग्न झाल्याचे दिसून आले. आनंदाच्या वातावरणात संमेलनाची सांगता झाली. संमेलनासाठी पूजा मढे, कामिनी ठोके, परेश पितृभक्त, अनिरुद्ध पगारे, अश्विनी देवकाते, विकी वाघ, मनीष बाविस्कर, मोहसीन शेख, रविंद्र कवडे, अमोल परदेशी, राजेश सादगिर, योगेश दराडे, उज्वला बंस्ववांल, मनीषा बिडगर, योगिता मोरे, पूजा पगारे, शैलेश सोनवणे, सुजित सांगळे, राज निकाळे यांनी परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व माजी विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनी उपस्थिती लावून स्नेहसंमेलनाची शोभा वाढवली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments