आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड आणि उपनगर पोलिसांचा संयुक्त रूट मार्च
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड आणि उपनगर परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस दलाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक रोड आणि उपनगर पोलिसांनी संयुक्त रित्या रुट मार्च आयोजित केला होता.
नाशिक रोड बसस्थानक, सुभाष रोड, देवळाली गाव, रोकडोबा वाडी, खोले मळा, अनुराधा चौक मार्गे नाशिक रोड पोलिस ठाणे या मार्गाने हा रुट मार्च आयोजित करण्यात आला.
या रुट मार्च मध्ये नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या सह नासिक रोड पोलीस स्टेशन कडील २० पोलिस अंमलदार , 34 होमगार्ड , उपनगर पोलीस स्टेशन कडील 17 पोलिस अंमलदार व सीआयएसएफ फोर्सचे 2 अधिकारी व 48 अंमलदार, आरसीपी पथकाचे 2 अधिकारी व 18 अंमलदार असे एकूण 8 अधिकारी 103 अंमलदार व 63 होमगार्ड सहभागी झाले होते.