पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने ‘जागतिक महिला दिनी’ महिलांचा सन्मान
‘जागतिक महिला दिना’ निमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने रस्त्यावरील कष्टकरी कामगार माता भगिनी महिलांचा पुष्प देऊन सन्मान करण्यात आला येऊन त्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे आणि ज्येष्ठ साहित्यिक साराभाई वेळुंजकर यांनी उपस्थित सर्व महिलांचा पुष्प देऊन सन्मान केला.यावेळी शशीभाई उन्हवणे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याचा उजाळा करून दिला तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदूकोड बिल मांडून देशातील आणि जगातील महिलांच्यापुढे मोठाआदर्श निर्माण केला म्हणून आज महिलांना सर्वत्र सन्मानाचे आणि स्वाभिमानाचे जीवन जगायला मिळत आहे.
म्हणून डॉ.आंबेडकरांना विश्वरत्न आणि युगपुरुष म्हणून ते अजरामर आहेत. जगातील महिलांनी हिंदू कोडबिल वाचला पाहिजे.पण भारतातील महिलांनी त्यांचा आदर्श घेवून एकदा तरी हिंदू कोडबील काय आहे तो समजून घ्यावा त्यातूनच आज महिला मोठ्या पदांवरती जावून पदे मिळवत आहे ही सर्व ह्या महापुरुषांची आपल्यावर उपकारच आहे असे प्रतिपादन यावेळी शशीकांत उन्हवणे यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी सुनीता कर्डक, वर्षा जाधव, मीना पगारे, वर्षा जाधव, शालिनी घुसळे, नंदा गुंजाळ, अनिता मोरे, संगीता वाघ, लक्ष्मी गडगडे, अलका निकम, ज्योती आहिरे, रोशनी बन्सी, नंदा गुंजाळ, अनिता मोरे, अनिता कर्डक तसेच पुरुष पीआरपीचे राज निकाळे, रवी पगारे रवी, जावेद शेख, शरद सोनवणे, भारत कर्डक, आबिद शेख, शाहरुख खान, मोबिन खान, हारून टकारी, मुरली कोळे, शादाब शेख, देविदास पवार,शरद सोनवणे, गोविंद शिंगारे,आदी पुरुष व महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.