पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कायदे सल्लागार कमिटी अध्यक्षपदी ऍडव्होकेट शशिकांत उन्हवणे. …
नाशिक पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या राज्यस्तरीय बैठकीत ऍडव्होकेट शशिकांत उन्हवणे यांची पक्षाच्या राष्ट्रीय कायदे सल्लागार कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
पीपल्स रिपब्लिकन पार्टी जेलरोड नाशिकरोड राजराजेश्वरी येथे झालेल्या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लॉन्ग मार्चचे प्रणेते प्रा.जोगेंद्रजी कवाडे सर यांच्या उपस्थितीत तसेच पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष यांच्या अध्यक्षते खाली झाली बैठक संपन्न झाली. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या लघुउद्योगाचे नवनिर्वाचित उपाध्यक्षपदी निवड झालेले पक्षाचे कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
बैठकीत सर्वसंमतीने निर्णय शशिकांत उन्हवणे यांची राष्ट्रीय कायदे सल्लागार कमिटीच्या अध्यक्षपदी नवनियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रा. जोगेंद्रजी कवाडे सर, भाई जयदीप कवाडे, गणेशभाई उन्हवणे यांनी शशिकांत उन्हवणे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे राज्यस्तरीय झालेल्या मीटिंगचे अध्यक्षपदी होते. बैठकीत सरांनी पक्षाच्या विविध भूमिका आणि जनतेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कसा पक्ष वाढेल याबद्दल कार्यकर्त्यांना मार्गदर्शनपर सूचना केल्या. यावेळी पक्षाची रमाई ब्रिगेडचे अध्यक्ष रत्नाताई मोहोड तसेच प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले तसेच प्रदेश युवक अध्यक्ष सोमनाथ भोसले, दौलत हिवराळे उपस्थित होते. यावेळी ऍडव्होकेट शशिकांत उन्हवणे यांनी सांगितले की राष्ट्रीय नेते प्रा.जोगेंद्रजी कवाडे सर, जयदीपजी कवाडे प्रदेशाचे गणेशभाई उन्हवणे यांनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी ही मी संपूर्ण प्रामाणिकपणाने पार पाडील व संपूर्ण महाराष्ट्र देशभरामध्ये पक्षाच्या मागे वकिलांची फौज कशी निर्माण होईल याकडे लक्ष केंद्रित करून कुठेही अन्याय अत्याचार झाला असेल त्या ठिकाणी आदरणीय प्रा.कवाडे सरांच्या नेतृत्वाखाली अन्याय विरुद्ध कार्यकर्त्यांना सक्षम व स्वाभिमानी बनवण्याचे कार्य हाती घेईल.