HomeUncategorizedनाशिकरोड पोलिस ठाण्यात १३० वाहन मालकांचा शोध.... बेवारस वाहनांचा लवकरच लिलाव....... पोलिस...
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

नाशिकरोड पोलिस ठाण्यात १३० वाहन मालकांचा शोध…. बेवारस वाहनांचा लवकरच लिलाव……. पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांचे आवाहन

नाशिकरोड पोलिस ठाण्यात १३० वाहन मालकांचा शोध…. बेवारस वाहनांचा लवकरच लिलाव……. पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांचे आवाहन…..

नाशिकरोड पोलीस ठाणे आणि गंगामाता वाहन शोध संस्थेने लावला १३० गाडयांच्या मुळ मालकाचा शोध नाशिक शहरातील पोलिस ठाण्यातील स्वच्छ वातावरणात कामकाज व्हावे यासाठी नाशिक पोलीस आयुक्तांच्या पुढाकारने शहर पोलीस आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यातील बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेण्याचे काम पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हाती घेतले.

यासाठी त्यांनी पुण्यातील गंगामाता वाहन शोध संस्थेला पाचारण केले.  शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या आवारात शेकडो बेवारस वाहने मालकांच्या प्रतिक्षेत वर्षानुवर्ष अक्षरशः धुळ खात पडुन आहेत. वाहनांचे मालक सापडत नसल्याने वाहने संभाळण्याचे काम पोलिसांसाठी डोके दुखी ठरली होती. पोलीस आयुक्तांनी अखेर यावर मार्ग शोधुन काढून नाशिक शहर पोलिस व गंगामाता वाहन शोध संस्था पथक, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यातील बेवारस वाहनांचा शोध घेण्याचे काम सुरू केले. शहरात सर्वच पोलीस ठाण्यात असाच प्रकार असून तेथे ही शेकडो वाहने धुळ घात पडुन आहेत. मात्र अशा बेवारस मालकांचा शोध लावण्याचे काम सुरू केले. पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात मूळ मालकांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली. शोध मोहीम कारवाईत नाशिकरोड पोलीस ठाण्यातील १३० बेवारस वाहनांचे वाहन मालकांचा या मोहिमेत शोध लागलेला आहे. यामध्ये एकूण ९५ दुचाकी व ३० चार चाकी व ५ ऑटो रिक्षा अशी एकुण १३० वाहने बेवारस अवस्थेत अनेक वर्षापासुन धुळखात पडुन आहेत त्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणुन बेवारस वाहने ज्या मालकांची आहेत त्या वाहन मालकांनी आपल्या वाहनाची कागदपत्रे दाखवुन सात दिवसाच्या आत आपली वाहने घेवुन जावेत अन्यथा पोलीसांकडुन त्या वाहनाची कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करण्यात येईल असे आव्हाहन नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी केले आहे.

पोलीस ठाण्यात शेकडो वाहने विविध गुन्हयात पोलीस जप्त करतात मात्र न्यायालयीन प्रक्रीयेमुळे व बेवारस वाहनाचे मालक मिळुन येत नसल्याने ही वाहने पोलीस ठाणेच्या आवारात अनेक वर्ष मालकाच्या प्रतीक्षेत धुळखात पडुन आहेत.
नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीसांनी बेवारस वाहनाच्या मालकाचा शोध घेण्यास सुरूवात केली त्यासाठी पोलीसांनी परंदवाडी तळेगाव दाभाडे, ता मावळ, जि पुणे येथील महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या गंगामाता वाहन शोध संस्थेची मदत घेतली. संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात बेवारस अवस्थेत असलेल्या वाहनाची पाहणी केली. पोलीसांनी बेवारस वाहनांचे चेसीस नं व इंजिन क्रमाकांवरून दोनच दिवसात १३० वाहनाच्या मुळ मालकाचा शोध घेतले. पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, पोलीस उप निरीक्षक विलास कोटमे, संध्या कांबळे, संदिप पवार यांच्यासह गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यश्व राम उदावंत, उपाध्यक्ष बाळासाहेब बागडे, भारत वाघ, यांनी परिश्रम घेतले, तसेच ज्या मालकाची वाहने असतील त्यांनी पोलीस ठाणेस येवुन आपले वाहन तपासुन घेवुन जावे. तसेच सदरचे वाहन घेवुन न गेल्यास कायदेशीर प्रक्रीया पुर्ण करून त्यांचा लिलाव केला जाईल व त्यातुन आलेली रक्कम सरकारी भरणा करण्यात येईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगीतले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Join WhatsApp Group