CNG विक्री बंद करण्याचा इशारा…… अध्यक्ष विजय ठाकरे यांचा इशारा…..
नाशिक शहरात CNG पंप सुरू झाल्याने वाहनधारकांना चांगली सुविधा होईल अशी आशा होती पण सुरळीत पुरवठा होत नसल्याने पंप चालकांना आणि वाहनधारकांना त्रासदायक आणि अडचण होत आहे. CNG भरायचे असल्यास मोठ्या वाहनांच्या लांबच्या लांब रांगा. गेल्या काही दिवसापासून नाशिककर सीएनजीच्या गोंधळामुळे त्रस्त झालेले आहेत.
पेट्रोल पंप चालक देखील सीएनजी विक्रेते म्हणून अतिशय होरपळून निघालेले आहेत. MNGL ला वारंवार सांगूनही यात सुधारणा होत नसल्याने MNGL ला 25 एप्रिल 2025 पर्यंत रोज निदान दहा तास सुरळीत सीएनजी पुरवठा न झाल्यास 26 एप्रिल 2025 पासून सीएनजी विक्री जिल्ह्यामध्ये बंद करण्याचा इशारा नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर असोसिएशन अध्यक्ष
विजय ठाकरे यांनी दिला आहे.