अंदरसुल शिवारात फर्निचरचे दुकान फोडणारे चोरटे ग्रामीण पोलीसांच्या जाळयात…… मुद्देमाल जप्त…..
.येवला तालुक्यातील अंदरसुल शिवारात फर्निचरचे दुकान फोडणारे चोरटे ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेऊन येवला तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
येवला तालुका पोलीस ठाणे हद्दीत दि. १० सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात आरोपिंनी येवला अंदरसुल रोडवरील जीवन फर्निचर दुकानाचे पाठीमागील बाजुचे शटर तोडून दुकानात प्रवेश करून दुकानतील एल.ई.डी. टीव्ही, सिलींग फॅन, कुलर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तु तसेच तांब्याची व पितळाची भांडी असा एकुण २,७०,४००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेला होता.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. अनिकेत भारती व उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग श्री. बाजीराव महाजन यांनी वरील घटनेच्या अनुषंगाने सविस्तर माहिती घेवून येवला तालुका पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास गुन्हा उघडकीस आणणेसाठी सुचना दिल्या होत्या.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे व येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिप मंडलीक यांच्या पथकाने गुन्हयाचा संयुक्त तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखा व येवला तालुका पोलीसांनी वाळुंज एम.आय.डी.सी., जिल्हा छत्रपती संभाजीनगर परिसरातून संशयित गुलाम रफिक शेख, वय ४०, रा. हिदायत नगर, वाळुंज बु॥, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, दिपक लाचु ठुने, वय १९, रा. वांगेभरारी, सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना ताब्यात घेतले. तपासात चौकशी केली असता, त्यांनी त्यांचे वाळुंज जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील साथीदार संतोष कांबळे, करण कांबळे व इतर साथीदार यांचेसह गेल्या पंधरा दिवसांपुर्वी येवला तालुक्यातील अंदरसुल शिवारात एका फर्निचर दुकानाचे शटर तोडुन इलेक्ट्रॉनिक साहित्य, तांबे/पितळाचे भांडे चोरून नेल्याची कबुली दिली आहे.
संशयित आरोपींच्या तव्यातून वरील गुन्हा करण्यासाठी वापरलेला छोटा हत्ती वाहन, गुन्हयात चोरीस गेलेले ०३ एल.ई.डी. टिव्ही, ७७ किलो वजनाची तांब्याची भांडी व १४ किलो वजनाची पितळाची भांडी असा एकुण ०२ लाख १० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयातील मुख्य आरोपी संतोष कांबळे व करण कांबळे हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर यापुर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती व उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे व येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिप मंडलीक, पोलिस उप निरीक्षक हर्षवर्धन बहिर, स्थागुशाचे, पोलिस उप निरीक्षक दत्ता कांभीरे, राजेंद्र पाटील, राजेंद्र बिन्नर, सचिन वैरागर, दिनकर पारधी, गणेश बागुल, सागर बनकर, नितीन पानसरे, पंकज शिंदे, दिपक जगताप, गिरीष निकुंभ, शरद मोगल, योगेश कोळी, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांच्या पथकाने वरील गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे.