सातपूर गोळीबार…. मोक्का अंतर्गत कारवाई….. शहरातील गुन्हेगारांना इशारा….
सातपुर पोलीस ठाणे हद्दीतील फायरिंगच्या गुन्हयातील पी. एल गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. पी. एल गँगचा मुख्य सुत्रधार संशयित प्रकाश मोगल लोंढे उर्फ बॉस व त्याच्या टोळीतील सदस्य आरोपींविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश २७ ऑक्टोबर रोजी निर्गमीत केले.

पी. एल गँगचा मुख्य सुत्रधार संशयित प्रकाश मोगल लोंढे उर्फ बॉस व त्याचे टोळीतील इतर सदस्यांनी गुन्हेगारी टोळी निर्माण करून एकटयाने किंवा संघटीत रित्या हिंसाचाराचा, अवैध शस्त्रांचा वापर करून धाक दपटशा दाखवुन हप्ते गोळा करणे, तसेच परिसरात वर्चस्व निर्माण करून खंडणी वसुल करणे याप्रकारे बेकायदेशीर कृत्य चालु ठेवले.
त्यांनी नियोजीतबध्द कट रचुन गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. तसेच आरोपीतांनी संघटीतरित्या गुन्हा केला असल्यानेपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन गुन्हयातील आरोपींविरुध्द कठोर कारवाई होणेकरीता महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी मोक्का कायदयाअंतर्गत ठोस कारवाई करण्यात आलेली आहे.
या गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त, अंबड विभाग नाशिक शहर यांचेकडे सोपविण्यात आला आहे.पोलीस आयुक्तांनी जे गुन्हेगार त्यांच्या गुन्हेगारी वृत्तीपासुन परावृत्त होणार नाहीत त्यांच्यावर मोक्का, एम.पी.डी.ए. व इतर कायदयान्वये प्रभारी कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

