आता बारी रिक्षा चालकांची….. शहरात आज पासून विशेष मोहीम…. नियमांचे पालन करण्याचे आवाहन…..
नाशिक शहरात विषेतः शहरातील मध्यवर्ती भागता आणि बाजार पेठ परिसरात काही ऑटो रिक्षा चालकांच्या बेशिस्त वर्तनामुळे वाहतूकीचा प्रवाह विस्कळीत होत आहे तसेच सर्व सामान्य जनतेस देखील रिक्षा चालकांच्या बेशिस्त वर्तनामुळे त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभुमीवर शहर पोलिस आयुक्तालय तर्फे ‘ऑटो रिक्षा शिस्त मोहीम’ हाती घेण्यात येणार आहे. वाहतूक शाखेच्या अधिका-यांना कर्मचारी यांना बेशिस्त ऑटो रिक्षा चालकांवर कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सुचना देण्यात आल्या आहेत.

मोहिमे अंतर्गत रिक्षा चालकाने त्याचे नाव, परवाना धारकाकचे नाव, परवाना क्रमांक, बॅच, चालकाचा लायन्स क्रमांक रिक्षाच्या आतील दर्शनी बाजूस प्रवाशांना दिसेल अशा ठिकणी रिक्षात लावणे, सर्व ऑटो रिक्षा चालकांनी निर्धारित युनिफॉर्म परिधान करणे सदर युनिफॉर्मवर आर.टी.ओ. द्ववारे दिलेले बॅच स्पष्ट पणे परिधान लावणे, परवाना संपलेल्या व तांत्रिक दृष्ट्या अयोग्य किंवा धोकादायक रिक्षा चालवतांना मिळून आल्यास सदर ऑटो रिक्षांचे निलंबन करण्यात येईल, धोकादायक रित्या व वेगवान (ओव्हर स्पीड) स्वरूपात रिक्षा चालवितांना मिळून आल्यास कारवाई करण्यात येईल आदी बाबींवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

सदरची कारवाई मोहीम ही आज (२५ ऑक्टोबर )पासून शहरातील गंगापूर रोड, कॉलेजरोड, मुंबई नाका त्रंबक नाका, रविवार कारंजा, अशोकस्तंभ, शालीमार, सी.बी.एस. सिग्नल , सिटीसेन्टर मॉल, आनंदवल्ली, सारडा सर्कल, राजदुत हॉटेल, कॅनडा कॉर्नर व बाजार पेठ मालेगाव स्टॅण्ड, दिंडोरी नाका पंचवटी कारंजा, पेठ फाटा, मखमलाबाद नाका, रामकुंड, संतोष टी पॉईट, छ. संभाजी नगर नाका., नांदुर नाका, जत्रा हॉटेल, अमृत धाम, जेलरोड, बिटको सर्कल, शिवाजी पुतळा, रेल्वे स्टेशन, सुभाषरोड, मुक्तीधाम समोर, उपनगर नाका, दत्तमंदिर सिग्नल, बिटको कॉलेज समोर, द्वारका सर्कल, त्रिमुर्ती चौक, पाथर्डी फाटा, सातपूर, श्रमिकनगर, बारदान फाटा, पपया नर्सरी, एक्लो पॉईट, फाळके स्मारक, गरवारे टी. पॉईट, लेखानगर, इंदिरानगर भगूर, देवळाली गाव व कॅम्प, संसरी नाका, इत्यादी महात्वाच्या ठिकाणी राबविण्यात येणार आहे.

तसेच प्रादेशिक परिवाहन अधिकारी यांच्या सोबत वाहतूक नियंत्रण व तपासणी पथके नियुक्त करून पोलिसांकडून संयुक्तरित्या कारवाई करण्यात येणार आहे. तरी रिक्षा चालकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन नाशिक शहर पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, यांच्या आदेशान्वये वाहतूक शाखेच्या पोलीस उप आयुक्त श्रीमती किरिथिका सी.एम.यांनी केले आहे.

