Homeताज्या बातम्याहरीशेठ देवाणी यांचे दुःखद निधन... व्यापारी वर्गात शोककळा....
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

हरीशेठ देवाणी यांचे दुःखद निधन… व्यापारी वर्गात शोककळा….

‎नाशिकरोड येथील प्रसिद्ध  सागर पुस्तकालय आणि विनायक स्टेशनरी चे संचालक  श्री.हरीराम (हरीशेठ) देवाणी वय 68 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

रविवारी हरीशेठ यांची तब्येत बिघडल्याने त्यांना एका खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मावळली.
जेलरोड कलानगर येथील रहिवासी असलेले हरीशेठ देवाणी हे व्यावसायिक सामाजिक आणि धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असायचे. हरीशेठ हे पूज्य श्री छापरू पंचायत नाशिक चे उपाध्यक्ष तसेच पूज्य झुलेलाल मंदिरातील श्री झुलेलाल चॅरिटेबल ट्रस्ट चे विश्वस्त होते.
नुकतेच छापूरु पंचायतीचे होळी महोत्सव कार्यक्रमात त्यांनी हिरहिरीने सहभाग घेतला होता. अत्यंत मनमिळावू आणि चेहऱ्यावर सतत एक स्मित हास्य अशी त्यांची ओळख होती. सिंधी समाजातील थोर व्यक्तिमत्वाच्या निधनाने सिंधी समाज तसेच व्यापारी सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. हरीशेठ यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, तीन भाऊ,भावजय, सुना, नतवंडे असा मोठा परिवार आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments