ट्रकचालकास मारहाण करून लुटले…. दोन महिला पोलिसांच्या ताब्यात….. तीन जण फरार….
नाशिकरोड पोलिस ठाणे हद्दीतील चेहडी पुलाजवळ ट्रक चालकास मारहाण करून चार ते पाच जणांच्या टोळक्याने सहा हजार रुपये लुटण्याचा प्रकार घडला. रामनिवास गंगाप्रसाद वर्मा राहणार मध्यप्रदेश असे या मारहाण करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव असून त्याला मारहाण करून धारधार हत्याराने जखमी करण्यात आले.
महिन्यापासून महिंद्रा कंपनीत कंपनीची भारत बॅन्ज कंपनिच्या कंटेनर क. एमएच ०४ एम आर ०९४८ वर रामनिवास चालक म्हणून काम करतो. ०७ सप्टेंबर रोजी पहाटे ०४:०० वा सुमारास ते भारत बॅग्ज कंपनिव्या कंटेनर क्रमांक एमआर ०९४८ मध्ये महिंद्रा कंपनी सातपुर येथून कंपनीचा माल भरून कंटेनर अहिल्यानगर येथील महिंद्रा कंपनीत घेउन जात होते.

चेहडी दारणा पुलावर अचानक रामनिवास यांच्या गाडी समोर चार पाच लोकांनी एक ट्रक थांबवून कंटनेर बघताच ट्रक सोडुन रामनिवास यांचा कंटनेर आडवुन थांबविला तेव्हा त्यातील एका इसमाने जोरात आवाज देउन “धिरज तुम क्लिनर साईड से उपर चढ़ो” असे बोलल्याने त्यातील सफेद रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची जीन्स घातलेल्या एकाने क्लिनर साईडच्या बाजुने वर चढुन गाडीत प्रवेश केला, “आपको क्या चाहीये” असे रामनिवास याने विचारले असता त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.
रामनिवास यांनी घाबरून कंटनेर पुढे जोरात चालविला त्यावेळी त्याने धारधार हत्याराने रामनिवास यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर मारून मानेला काहीतरी हत्यार लावुन “तुम तुम्हारी गाडी इधर ही रोकदो नही तो मैं तुमको मार डालूंगा” असे बोलून गाडी थांबवण्यास सांगितल्याने रामनिवास यांनी गाडी पुढे जाउन रस्त्याचे बाजुला असलेल्या पेट्रोल पंपाच्या थोडे पुढे कंटेनर थांबविला. लागलीच सोबत असलेले चार जण रिक्षाने म गाडी पाठीमागुन येउन रिक्षा कंटेनरच्या समोर थांबविली तेव्हा गाडीमध्ये असलेल्या इसमाने त्याना आवाज देउन “धिरज, प्रेम, कोमल, निकीता तुम जलदी उपर आयो” असे बोलल्याने बॉयकट केलेले दोन पुरुष व दोन महिलांनी केस बारीक त्यातील एका महिलेने निळ्या रंगाचा कुर्ता व काळया रंगाची जिन्स पॅन्ट तसेच दोन्ही कानात बाळया घातलेल्या व दुसऱ्या महिलेने फुल बाईचा गुलाबी रंगाचा टी शर्ट त्यावर समोरील बाजुस छातीवर इंग्रजीत फॅशन (FASHION) असा लिहीलेला टी शर्ट घातलेला व आर्मी रंगाची पॅन्ट घातलेली कंटेनरमध्ये आले त्यातील गाडीत चढलेला एका इसमाने धिरज तुम इसको दिखाओ हम लोग कौन है” तेव्हा धिरज याने त्याच्या कडील टोकदार हत्याराने रामनिवास यांच्या डावे हातावर मारून मला जखमी केले व मला गाडीच्या खाली उतरवून सर्वांनी रामनिवास यांना मारहाण करून खिशातील ५०००/- हजार रूपये रोख बळजबरीने काढून घेतले. त्यापैकी एकाने त्याचे कडील धारधार हत्यार माझे पोटावर लावुन “हमको और पैसा देदो नही तो हम तुमको मार डालेंगे” असे बोलले पण मी त्यांना मेरे पास और पैसे नही है असे सांगितल्याने त्यातील एकाने रामनिवास यांच्या मालकाला फोन लावुन क्यु आर कोड वर १ हजार रुपये मागवून घेतले.
तेवढ्यात त्या ठिकाणी पोलीसांची गाडी येत असल्याचे बघिताच त्यातील पाच जणांपैकी तिन जण रिक्षात बसुन पळून गेले. त्यातील दोन महिलांना रिक्षात बसता न आल्याने त्यांना ते तेथेच सोडुन निघुन गेल्याने तेथे राहिलेल्या दोन महिला पळत असतांना महिला पोलीसांनी संशयित निकीता विलास आव्हाड, वय २९ वर्षे, रा. शुभसंकेत अपार्टमेंट, तुलसिपार्क, शिवाजीनगर, जेलरोड, नाशिकरोड, कोमल सुरेश आढाव, वय २३ वर्षे, रा. आनंद प्लाझा, जयहिंद नगर, राजराजेश्वरी, जेलरोड, नाशिकरोड यांना ताब्यात घेतले. प्रेम घाटे, धिरज घाटे, शुभम आबे (राठोड) अशी त्या पळून गेलेल्या तिघा संशयितांची नावे आहेत.
नाशिकरोड पोलीस ठाण्यात ट्रक चालकास लुटल्याप्रकाणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

