स्वर रंग वतीने ‘ माय मराठी गीत ‘ कार्यक्रमात बहारदार अविष्कार केला सादर ..
नाशिकरोड :- ” हृदयी वसंत फुलताना, प्रीतीचं झुळझुळ पाणी, चोरीचा मामला, ही नवरी असली, निसर्ग राजा ऐक सांगते, राणी माझ्या मळ्यामंदी, आला आला वारा, सांग कधी कळणार तुला, हे चिंचेचे झाड, राधा ही बावरी, हिरवा निसर्ग हा भोवतीने, फिटे अंधाराचे जाळे अशी एक से एक गीत सादर करून उपस्थित सर्व जेष्ठ श्रोत्यांची दाद मिळाली.
निमित्त होते….. स्वर रंग ईव्हेन्ट श्री. शैलेश सोनार प्रस्तुत ‘ माय मराठी ‘ हा गीत व नृत्याचा अनोखा अविष्कार नजराणा दि.२० ऑगस्ट २०२५ रोजी हिरावाडी रोड पंचवटी येथील वृद्धांना मायेचे उब देणारी संस्था ‘ वात्सल्य वृद्धाश्रम ‘ येथे उत्साहात व आनंदात सादर झाला. याप्रसंगी मनोरंजनात्मक गाणी व नृत्य सादर करण्यात आली. यात स्वतः गायक शैलेश सोनार यासह गायिका मनुजा रत्नपारखी , अर्चना सोनवणे, मयुरी मुरुडेश्वर, माधवी भसे, अर्चना पाटील , गायक संगीततज्ञ किशोर वडनेरे, सुनिल पाठक, सुरेंद्र चौधरी, दीपक सूर्यवंशी , प्रकाश महाले, विनोद साखरे, संजय परमसागर, मोहन निकम,श्रीराज सोनार आदि गायकांनी सोलो व डुएट मराठी गाणी सादर करून उपस्थित ज्येष्ठ आबाल वृद्ध नागरिकांची वाहवा मिळवली .प्रारंभी विशेष अतिथी मनोज पवार यांनी गणेश वन्दना सादर केली. याप्रसंगी आयोजक श्री शैलेश सोनार यांच्या संकल्पनेतून वृद्धाश्रमातील अंथरुणावर खिळलेल्या रुग्ण वयोवृद्ध आजी व बाबांना भोजनदान देण्यात आले .सर्व कलाकारांचे वात्सल्य वृद्धाश्रमाचे संचालक व संस्थापक अध्यक्ष सतीश सोनार व सौ. पायल सोनार, सुरेश चव्हाण यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
कार्यक्रमास गायिका प्रियंका कोठावदे व मनोज पवार, श्री साईबाबा ट्रस्टचे गांगुली परिवार यांची विशेष सहकार्य लाभले जे सध्या युसए मध्ये आहेत. सर्व कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते मोमेंटो देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे निवेदन सौ. रोहिणी सोनार यांनी खुमासदार पणे केले.