रिक्षा चालकाचा शोध…. महिलेला अडीच लाखाचे सोने परत….. नाशिकरोड पोलिसांची कामगिरी…..
रिक्षात विसरलेले 2 लाख 50 हजार रुपयांचे दागिने नाशिकरोड पोलिसांनी रिक्षा चालकाचा शोध घेऊन महिलेला दागिने असलेली बॅग परत केल्याने पोलिसांचे कौतुक होते आहे. पुजा चंद्रशेखर सरडे राह. मंगलम सोसा, डी-१५, श्री गुरूजी हॉस्पीटल जवळ, आनंदवली, नाशिक या २० जुलै रोजी सायं. 5 वाजेदरम्यान कल्याण येथुन त्यांच्या ३ वर्षाचा लहान मुलगा व त्यांचे सोबत असलेल्या बॅग ज्यामध्ये ०१ तोळयाची सोन्याची चैन, सोन्याचे ब्रेसलेट, बाळाची सोन्याची अंगठी, चादिचे दोन कमरपट्टे अशी एकुण २,लाख ५० हजार रुपये किंमत असलेले सोन्या चांदीचे मौल्यवान दागिने हे सोबत घेवुन नाशिकरोड रेल्वे स्टेशन याठिकाणी उतरून त्या रिक्षात बसुन द्वारका, नाशिक याठिकाणी पोहचल्यानंतर सदर अनोळखी रिक्षावाल्याने अर्जदार यांना दुस-या रिक्षात बसण्यास सांगितले तेव्हा अर्जदार हे घाईगडबडीत दुस-या रिक्षात त्यांच्या लहान मुलासह गंगापुररोड याठिकाणी जाण्यासाठी बसल्या त्यानंतर थोड्याच अंतरावर गेल्यां नतर त्यांचे लक्षात आले की त्यांची सोन्या चांदीचे दागिने असलेली बॅग हि मागील बसलेल्या रिक्षात राहुन गेल्याचे लक्षात आले. पूजा सरडे ह्या पुःन्हा द्वारका याठिकाणी येवुन सदर रिक्षा चालकाचा शोध घेतला असता त्यांना तो रिक्षाचालक मिळुन आला नाही.
त्यानंतर त्यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात बॅग हरवले बाबत आणि दागिन्यांचा शोध घेणेबाबत अर्ज दिला होता. अर्जाची चौकशी करीत असताना नाशिकरोड पोलीस ठाण्याचे आशिष गायकवाड, सुजित जाधव व अखलाक शेख, नाठे नाशिकरोड रेल्वे स्टेशन रिक्षा स्टॅन्ड येथे जावुन सी.सी.टी. व्ही. फुटेजची पाहणी करून सदरचा रिक्षाचा क्रमांक एम.एच.१५ ए.जे. ४७४० असल्याचे शोध घेऊन रिक्षा ही द्वारका, नाशिक येथील स्टॅण्डवर प्रवासी वाहतुक करत असलेबाबत माहिती मिळाल्याने लागलीच द्वारका, नाशिक येथील रिक्षा स्टॅण्ड येथे जावुन सदर रिक्षा चालकाचा शोध घेतला असता आसिफ मुसा शहा असे रिक्षा चालकाचे नाव कळले. तसेच आसिफ शहा संपर्क करून बॅग बाबत विचारणा केली असता त्याने समक्ष बॅग व सदर बॅग मध्ये असलेलले सर्व दागिने पोलिसांना दिले.
पोलिसांनी दागिन्यांची बॅग पडताळून दागिने पुजा चंद्रशेखर सरडे यांच्या ताब्यात दिली. नाशिकरोड पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखविल्याने महिलेस तिचे २ लाख ५० हजार रूपये किंमतीचे श्रीधन परत मिळाले.सदर उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त किशोर काळे, सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी, नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.