देशाला विशिष्ट कालावधीत दिव्य भारत बनवण्यासाठी विविध अध्यात्मिक संस्थांनी एकत्र येऊन देवळाली कॅम्प येथे केले बैठकीचे आयोजन
नाशिक, (दिनांक 13 जुलै आपल्या भारत देशाला एक सीमित कालावधीपर्यंत दिव्यत्वात पोहोचवण्यासाठी काही अशासकीय संस्था व आध्यात्मिक पार्श्वभूमी असलेल्या जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन मिशन दिव्य भारत या नावाने एक व्यासपीठ सुरू केले. याचा मुख्य उद्देश भारताचे आध्यात्मिकदृष्ट्या जागृत, सामाजिकदृष्ट्या सुसंवादी, आर्थिकदृष्ट्या चैतन्यशील, पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत आणि नैतिकदृष्ट्या शासित राष्ट्र, दिव्य धरतीसाठी दिव्य भारत बनविणे असा आहे. हे अभियान सर्व सामान्य व जागरूक नागरिक, सर्व सामाजिक- अध्यात्मिक संस्था तसेच सर्व स्तरातील नागरिकांना आध्यात्मिक उद्देशाने आणि सामूहिक जबाबदारीने एकत्र येऊन न्याय्य, आनंदी आणि जागृत समाजाची निर्मिती करण्याचे आवाहन करते. या अभियाना अंतर्गत देशातील 24 शहरांमध्ये बैठकींचा मानस आखण्यात आला आहे. याची पहिली बैठक मुंबई येथे दिनांक १ जुन रोजी संपन्न झाली असून दुसरी बैठक दिनांक 13 जुलै रोजी नाशिक येथील देवळाली कॅम्प स्थित द लेसली साव्हनी ट्रेनिंग सेंटरच्या सभागृहात झाली. मुंबई येथील दिव्यनुर फाउंडेशनच्या मार्गदर्शनात संपन्न झालेल्या या बैठकीत नाशिक शहरातील नामांकित अशासकीय व आध्यात्मिक संस्था व प्रतिष्ठित व्यक्तींनी सहभाग नोंदवला. यात विशेषतः दिव्य नूर फाऊंडेशन तर्फे हमीदसाई, श्रीनाथ मिथानथय्या व डॉ. के. रंगनाथन तसेच ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी ब्रह्माकुमारी मीरा दीदी ब्रह्माकुमार दिलीप भाई, योग साधना मंदिरचे साबीर शेख, श्री रामकृष्ण आरोग्य संस्थेचे स्वामी श्रीकंठनंद, भारतीय योग विद्या धामचे श्री अनंत वाडी, आध्यात्मिक साधक सुशीलकुमार सिंग व श्रीमती एस. सिंग, आध्यात्मिक साधक श्री मोहसिन , आध्यात्मिक समुपदेशक इसरार अहमद , सामाजिक-आध्यात्मिक विचारवंत कारी उमेद अली, निसर्गोपचार व वेलनेस कोच डॉ. मुनिराह कुरैशी, महा योग वेलनेस सेंटरच्या सौ. सरस्वती, अक्षर साधनेच्या सौ. मानषी, एम.ई. होलिस्टिक सेंटरच्या सौ. मंजुश्री राठी, सामाजिक-आध्यात्मिक विचारवंत सौ. आयेशा व सौ. नूर बानू, आध्यात्मिक व सर्वांगीण उपचारक सौ. भारती ओझा, ओमसाई डिव्हाईन हीलिंगचे विकी अमीचंदवाला, आध्यात्मिक डॉक्टर सौ. सिल्व्हिया फर्नांडिस, आणि तसेच मुंबई जळगाव, नाशिक, संभाजीनगर व हरियाना इत्यादी ठिकाणावरून विविध संस्थांचे पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित होते
संपूर्ण दिवसभरात राऊंड टेबल बैठकीच्या या आयोजनात उपरोक्त संस्थानी भारताला एक सीमित कालावधीपर्यंत दिव्यभारत बनवण्याच्या प्रक्रियेत काय करता येईल याविषयी सृजनशील मुद्दे उपस्थित केले.
दिव्य भारत मिशनला पूर्णत्वास नेण्यासाठी स्पिरिचुअल अलायंस ऑफ इंडिया अर्थात साई (SAI) या व्यासपीठाची सुरुवात करण्यात आली या व्यासपीठांतर्गत आध्यात्मिक व सामाजिक कार्य करणाऱ्या सदस्यांना सोल्स SOULs अर्थात सीकर ऑफ युनिटी अँड लव्ह असे संबोधण्यात आले.
स्पिरिच्युअल अलायन्स ऑफ इंडिया (SAI) संपूर्ण भारतातील आध्यात्मिक नेते, संस्था आणि साधकांसाठी एक एकात्मिक व्यासपीठ म्हणून काम करेल, हे व्यासपीठ खालील उद्दिष्टांद्वारे अध्यात्म, सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रीय विकास यांना जोडण्याचे काम करेल.
१. आध्यात्मिक नेतृत्वाचे एकत्रीकरण – एक सहयोगी नेटवर्क तयार करणे ज्यामध्ये आध्यात्मिक नेते आणि संस्था एकत्र येऊन एकता, शांती आणि उद्देशाच्या सामायिक मूल्यांना प्रोत्साहन देणे.
२. दिव्य भारताच्या दृष्टिकोनाची सेवा करणे – मोठ्या ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमांद्वारे अध्यात्म आणि दिव्य भारताची जागरूकता पसरवणे आणि एक मजबूत ऑनलाइन उपस्थिती निर्माण करणे.
नियमित राष्ट्रीय आध्यात्मिक महोत्सवांद्वारे मिशन दिव्य भारताच्या उद्देशाशी एकरुप करणे.
राजकारण, व्यवसाय, शिक्षण आणि सामाजिक कार्य यासारख्या क्षेत्रातील इतर सामाजिक भागधारकांच्या सहकार्याने मिशन दिव्य भारतची व्याप्ती वाढवणे.
३. राष्ट्रीय परिवर्तनासाठी अंतर्गत परिवर्तनाला प्रोत्साहन द्या, आध्यात्मिक साधनाद्वारे वैयक्तिक परिवर्तन हा सामाजिक आणि राष्ट्रीय परिवर्तनाचा पाया आहे यावर भर देणे.
ध्यान, आत्मचिंतन, आत्मजागरूकता आणि नैतिक जीवन यासारख्या आध्यात्मिक पद्धतींना आंतरिक विकासाची साधने म्हणून प्रोत्साहन देणे.
४. सार्वजनिक जीवनात सेवेला प्रेरणा देणे आणि नीतिमत्ता पुनर्संचयित करणे.
सोशल अलायन्स ऑफ इंडिया (SAI) च्या सहकार्याने आरोग्य, शिक्षण, पर्यावरण इत्यादींमध्ये आध्यात्मिकरित्या प्रेरित सामाजिक सेवा प्रकल्पांना प्रोत्साहन देणे. सार्वजनिक संस्था आणि राजकीय जीवनात नैतिक नेतृत्व, सचोटी आणि धर्म-केंद्रित प्रशासनासाठी जागरूकता पसरवणे.
५. आध्यात्मिक वारशाचे पुनरुज्जीवन आणि आधुनिकीकरण करणे – आधुनिक संदर्भात प्राचीन ज्ञानाचा पुनर्शोध आणि अर्थ लावून जागतिक प्रभाव निर्माण करणे.
समकालीन विज्ञान आणि मानसशास्त्रासह शाश्वत आध्यात्मिक ज्ञानाची जोड देणारे संशोधन, प्रकाशने आणि शैक्षणिक उपक्रमांना समर्थन देणे.
या बैठकीत डिवाइन भारत हे मिशन पूर्ण करण्यासाठी रोडमॅप सुद्धा आखण्यात आला. यात निकट भविष्यकाळात विविध कार्यांसाठी एक मुख्य संघ आणि उप-संघ तयार करणे. समाज माध्यमांद्वारे ऑनलाइन उपस्थिती निर्माण करणे.
भारतातील विविध शहरांमध्ये SAI एसएआय (स्पिरिच्युअल अलायन्स ऑफ इंडिया) चे अध्याय सुरू करणे. पहिला राष्ट्रीय आध्यात्मिक महोत्सव आयोजित करणे. इत्यादी विषयांवर चर्चा झाली.
संपूर्ण दिवसभरात चाललेल्या या चर्चासत्रात विविध ठिकाणातून आलेल्या सदस्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी दिव्य नूर फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष हमीदसाई हे होते. सूत्रसंचालन दिव्य नूर फाउंडेशन चे श्रीनाथ मिथानथय्या यांनी केले तर पाहुण्यांचा प्रतिनिधिक सत्कार ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी यांनी केला. बैठकीत उपस्तित सर्व सदस्यांनी आपली दर्जेदार व उत्स्फुर्त मनोगत प्रगट केले.