घरफोडी करणारा आरोपी जेरबंद…..घरफोडीचे २ गुन्हे उघडकीस…..भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी…..
भद्रकाली पोलिसांनी घरफोडी करणारे आरोपींना जेरबंद करून २ गुन्हे उघडकीस आणले आहे. २६ जानेवारी रोजी रात्री तीन वाजेच्या सुमारास सुमनदेवी सुभाष शहा, वय ३५ वर्षे, व्यवसाय – टेलरिंग, रा- घर नं ४०१५, कुंभारवाडा, नागवाडा, भद्रकाली नाशिक यांनी त्यांचे घरात घरफोडी करून ५०,०००/- रू किं. जुने वापरते १४ ग्रॅम वजनाचे सोने व २०.०००/- रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरफोडी करून चोरून नेली असल्याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हयातील आरोपी हा वडाळा, नाशिक असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने भद्रकाली गुन्हे शोध पथकातील धनंजय हासे यांनी गुन्हे शोध पथकाचे मदतीने संशयित आरोपी इम्रान हानीफ पठाण, वय ३२ वर्षे, रा. रा. फ्लॅट नं. २, बिल्डींग नं. सी-२, रेणुका नगर, वडाळानाका, नाशिक यास १० एप्रिल रोजी व्दारका परिसरातुन ताब्यात घेऊन गुन्हयात चोरीस गेलेले ५०,०००/- रू. किंमतीचे दागिन्यांची बनविलेली सोन्याची लगड हस्तगत करण्या आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास गुन्हेशोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार व पथक करीत आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त, किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव, सहा. पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील,
पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, पोलीस निरीक्षक विक्रम मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, सतिष साळुंके, कय्युम सैय्यद, नरेंद्र जाधव, संदिप शेळके, लक्ष्मण ठेपणे, निलेश विखे, धनंजय हासे, जावेद शेख आदींनी पार पाडली आहे.