Homeक्राईमपत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या..... आजारपणाला कंटाळून हत्या आणि आत्महत्या.....
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या….. आजारपणाला कंटाळून हत्या आणि आत्महत्या…..

निवृत्त शिक्षक पत्नीच्या आजारपणाला कंटाळून तिची हत्या करून निवृत्त मुख्याध्यापकांनी स्वतः आत्महत्या केली.

जेलरोड येथील वीर सावरकर नगर मधील एकदंत अपार्टमेंट येथे झालेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.पत्नीच्या आजारपणाला कंटाळून वृद्ध पतीने पत्नीची गळा दाबून हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार जेल रोडच्या शिवाजीनगर परिसरातील वीर सावरकर नगर, नीलमणी पार्क येथील एकदंत अपार्टमेंट मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट मध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर रामचंद्र जोशी (वय 78)हे सेवानिवृत्त मुख्याध्यापिका लता मुरलीधर जोशी (वय 76)हिच्यासह राहत होते.

सेवानिवृत्त झाल्यानंतर उंबरखेड येथून सन 2017 साली ते या ठिकाणी राहायला आले होते. अनेक वर्षांपासून पत्नी आजारी होती, काही दिवसांपूर्वी ती रुग्णालयामध्ये पत्नी कोमात होती. त्यातून त्या बाहेर आल्या होत्या पण सतत आजारी असल्याने पती मुरलीधर यांनी निराशेतून तसेच पत्नीचे आजारपणाचे दुःख सहन न झाल्यामुळे टोकाचे पाऊल उचलीत पत्नीची गळा दाबून हत्या करून स्वतः आत्महत्या केली.

हत्या आणि आत्महत्येच्या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्या करीत असल्याचे पतीने सुसाईड नोटमध्ये उल्लेख केल्याचे कळते. या पती-पत्नीची मुले मुंबईत उच्च पदावर कामाला असून त्यांना ही घटना कळताच ते रात्री मुंबईहून नाशिकला निघाले आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आपल्या टीम सह घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेहांना शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे. अधिक तपास उपनगर पोलिस करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments