सिद्धार्थ नगर येथे वीर एकलव्य जयंती साजरी…..
वीर एकलव्य यांची जयंती एकलहरे येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
गोविंदा फाउंडेशन व संघर्ष महिला मंडळ व विर एकलव्य महिला मंडळातर्फे वीर एकलव्य जयंती साजरी करण्यात आली होती. 9 ऑगस्ट रोजी सिद्धार्थ नगर एकलव्य बांधवांमध्ये उत्साह असं वातावरण उत्साहातजयंती साजरी झाली. यावेळी अभिषेक भाऊ वारडे यांच्या हस्ते वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
 
सुखदेव वारडे, गणेश शेठ बटाटे, रामकृष्ण शिंदे, रोशन माळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाध्यक्ष समाधान गोकुळ सोनवणे व मित्रपरिवार होते. यावेळी विर एकलव्य महिला मंडळ संस्थापक अध्यक्ष उषाबाई मुरलीधर धोंडगे, अध्यक्ष पमाबाई चव्हाण, उपाध्यक्ष लताबाई गोकुळ सोनवणे, कार्याध्यक्ष सरिता अनिल चव्हाण, सचिव उषाबाई संजय चव्हाण, संघर्ष महिला मंडळ संस्थापक अध्यक्ष मुक्ताबाई खर्जुल, अध्यक्ष सविताबाई चंद्र मोरे, उपाध्यक्ष रमाबाई गायकवाड, कार्याध्यक्ष संगीताबाई माळी, सचिव संगीता ताई वार्डे सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
                
 
                                    