विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने नासिक रोड येथे भव्य देखाव्याचे भूमिपूजन.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या भव्य देखाव्याचे भूमिपूजन विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला
गेल्या दोन ते तीन वर्षापासून कोरोनामुळे उत्सव साध्या प्रमाणे साजरा करण्यात येतात होते यावर्षी कुठलेही निर्बंध नसल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे गेल्या तीन आठवड्यापासून जय्यत तयारी सुरू असून याच पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानक येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जयंतीनिमित्त भव्य असा देखावा साकारण्यात येणार आहे सुरुवातीला बौद्ध वंदना घेण्यात आली दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन समितीच्या वतीने करण्यात येणार आहे
यावेळी समिती अध्यक्ष बाळासाहेब भालेराव,आनंद सोनवणे,पवन पवार,संजय भालेराव,भारत निकम,प्रशांत दिवे,शरद मोरे समीर शेख, अमोल पगारे,राम बाबा पठारे, शेखर भालेराव,संतोष कांबळे, प्रमोद साखरे,हरीश भडांगे, सनी वाघ,साहिल निकम, रोहित निरभवणे, अवि वाघ,भारत पुजारी,दिनेश दासवाणी,संतोष पाटीलआकाश भालेराव,विशाल घेगडमल.