चेट्रीचंड झुलेलाल अवतरण दिवस निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम .
सिंधी बांधवांचे कुलदैवत वरुण अवतार भगवान पूज्य झुलेलाल यांचा अवतरण दिवसनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमंचे करण्यात आले आहेत. नासिक रोड, नाशिक, तसेच देवळाली कॅम्पला हा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. त्यासाठीची तयारी मोठ्या भक्तिभावाने सुरू आहे. भगवान पूज्य झुलेलल यांची जयंती गुरुवार 23 मार्च रोजी साजरी करण्यात येणार आहे. नुकतीच शहरातील मंदिरात याबाबत सिंधी समाजाची बैठक पार पडून विविध कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले.
नासिक रोड येथे बुधवार 22 मार्च रोजी सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत फन फेअर चे आयोजन करण्यात आले असून यात सिंधी व्यंजन स्पर्धा, सिंधी डान्स, ओपन माईक, सिंधी फूड स्टॉल्स, सिंधी संस्कृती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. गुरुवारी 23 मार्च रोजी सकाळी पूज्य बहरणा सहिबची भाविकांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात येणार असून त्यानंतर कार्यक्रमांना सुरुवात होईल. सकाळी 10 वाजेपासून रक्त दान शिबिर, 11 वाजता दी मा भगवान यांचे सत्संग, दुपारी 1 वाजेपासून राजस्थान कोटा येथून येणारे गायक यांचे सिंधी संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत, सायंकाळी मंदिरापासून नाशिकरोड परिसरात मोटार सायकल रॅली काढण्यात येणार येणार असून, 5 वाजता जादूगार ए लाल यांच्या जादूचे प्रयोगाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर 7 वाजेपासून पुन्हा सिंधी भक्ती गीतांचा कार्यक्रम रात्री 10 वाजे पर्यंत होणार आहे.
नासिक सिंधी पंचायती तर्फे तपोवन रोड वरील रामी भवन येथे पूज्य बहिराना साहिब पूजा करून त्यांनतर रामी भवन ते डोंगरे वसतीगृह पर्यंत बाईक रॅली निघणार आहे. डोंगरे वसतिगृह येथे सायंकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. देवळाली कॅम्प येथील झुलेलाल मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून बहिरणा साहिब पूजा, सिंधी संगीताचा कार्यक्रम तसेच सायंकाळी मंदिरापासून मिरवणूक काढण्यात येणार आहे. या सर्व दिवसभर चालणाऱ्या कार्यक्रम दरम्यान दिवसभर पूज्य झुलेलाल साई यांचा भव्य भंडारा सुरू राहणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेऊन सेवेचा आणि महा प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन, नासिक सिंधी पंचायत, देवळाली कॅम्प पुज सिंधी पंचायत आणि पूज्य झुलेलाल सिंधी सेवा मंडल नासिक रोड तर्फे करण्यात आले आहे.