Thursday, June 1, 2023
Homeक्राइमनाशिक मध्ये पुन्हा एकदा गोळीबार,तपन जाधव वर कोयत्याने वार करत गोळीबार,

नाशिक मध्ये पुन्हा एकदा गोळीबार,तपन जाधव वर कोयत्याने वार करत गोळीबार,

1,680 Views

नाशिक मध्ये पुन्हा एकदा गोळीबार,तपन जाधव वर कोयत्याने वार करत गोळीबार


सातपूर परिसरातील कार्बन नाका येथील म्हसोबा मंदिराजवळ जुन्या वादातुन दोघा तरुणावर गोळीबार व कोयत्याने वार करत प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की आज दुपारी तपन जाधव आपल्या एम एच ०४ ई एक्स ५६७८ या चारचाकी वाहनातून प्रवास करत असताना कार्बन नाका परिसरात संशयित आरोपी आशिष जाधव आपल्या २ साथीदारांसह एम एच १५ डी एम ७६३९ या वाहनातून येत तपन जाधवच्या गाडीला धडक दिली. यानंतर गाडीखाली उतरत त्याच्यावर कोयत्याने वार केले व गोळीबार केला.

तिघांनी केलेल्या या हल्ल्यात तपन जाधव गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे, या घटनेनंतर धडक बसल्याने आरोपींची गाडी बंद पडली होती. यामुळे त्या मार्गावरुन जात असलेल्या गौतम शार्दुल कामगाराला संशयित आरोपींनी थांबवले. बंदूकीचा धाक दाखवत त्या कामगाराची दुचाकी एम एच १५ एफयु ७६५६ घेऊन आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला.


संशयित आरोपीच्या गाडीमध्ये कोयते आणि मिरची पावडर मिळून आले आहेत. सातपूर पोलीस घटना स्थळी दाखल झाले असून संशयित आरोपी फरार झाले आहेत. पोलिस संशयित आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेची माहिती मिळताच उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, विजय ढमाळ यांनी घटनास्थळी दाखल झाले

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments