एक दिवसीय तिकीट तपासणी मोहिमेत रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून १७.३० लाख केले वसूल
एक दिवसीय तिकीट तपासणी मोहिमेत भुसावळ रेल्वे विभागाने 70 गाड्या, प्रमुख स्थानक यावर तपासणी करून फुकट्या प्रवाशांकडून 17 लाखाच्या वर दंड वसूल करून रेल्वेला उत्पन्न मिळवून दिले.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस एस केडीया यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्य विभागीय वाणिज्य व्यवस्थापक शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ विभागात वाणिज्य व आर पी एफ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खंडवा ते इगतपुरी, अमरावती ते भुसावळ, चाळीसगाव – धुळे, जलंब – खामगाव विभागाची एक दिवसीय तिकीट चेकिंग मोहीम राबवण्यात आली.
वाणिज्य निरीक्षक, तिकीट तपासनीस आणि आरपीएफ जवान यांच्या संयुक्त पथक तयार करून सुमारे 70 गाड्यांची तपासणी करण्यात आली. नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, अकोला, बडनेरा या स्थानकांवरही तपासणी करण्यात आली. हि मोहीम यशस्वी करण्यासाठी 3 अधिकारी, व तिकीट चेकिंग स्टाफ, वाणिज्य स्टाफ व आर पी एफ स्टाफ असे एकूण 42 टीम तयार करून कर्मचारी वर्ग यांनी सखोल प्रयत्न करून 3022 केसेस द्वारे एकूण 17,30 लाख वसूल केले.