अवैध गावठी कट्ट्यासह एकास मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून अटक
नाशिक शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना शहर आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिल्याने शहर हद्दीत गुन्हेगारांचा शोध घेत असताना मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या प्रजित ठाकूर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदूर नाका परिसरात पोलिसांनी सापळा रचून समीर सागर पानसरे राहणार देवळाली गाव नाशिक रोड नाशिक यास ताब्यात घेऊन अंग झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काढतुस असलेले मॅक्झिन हस्तगत करण्यात आले आहे संशयिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत सदरची कारवाई मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील माळी, किशोर देसले, संदीप पवार, प्रजीत ठाकूर, समीर चंद्रमोरे, शेरखान पठाण आदींनी केली आहे.