Thursday, June 1, 2023
Homeक्राइमटोळक्याने गॅरेज मालकावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना

टोळक्याने गॅरेज मालकावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना

38 Views

टोळक्याने गॅरेज मालकावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना

 

जेलरोड परिसरात तिघांच्या अज्ञात टोळक्याने गॅरेज मालकावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. जेलरोड परिसरात असलेल्या वसंत कॉलनी येथे तिघांच्या अज्ञात टोळक्याने गॅरेज मालकावर हल्ला केला . यात गॅरेज मालक गंभीर जखमी झाले होते. नाशिकरोड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेच्या आधारे एकाचा शोध घेऊन संशयतास अटक केली असून इतर दोघे फरार आहेत.

जेलरोड येथील वसंत विहार कॉलनी मध्ये असलेल्या गॅरेजमध्ये योगेश मुळे हे पायऱ्यांवर बसले असताना तीन जणांच्या अज्ञात टोळक्याने त्यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी करत संशयित फरार झाले होते.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज शोधला असता फुटेजच्या आधारे शोध लागल्याने त्यातील सचिन चौधरी नावाच्या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. दोघेजण मात्र अद्यापही फरार आहेत.
पुढील तपास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश न्याहाळदे, उपनिरीक्षक गणपत काकड हे करत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments