अदानी समूहाच्या महा घोटाळा विरोधात पर्दाफाश आंदोलन…..
नाशिकरोड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्यावतीने अदानी समुहाच्या महाघोटाळ्याच्या विरोधात पर्दाफाश आंदोलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार स्टेट बँक शाखा दुर्गा उद्यान, नाशिकरोड येथे निदर्शने आंदोलन करण्यात आले. जनतेला जागृत करण्यासाठी, केंद्र सरकार कश्याप्रकारे भांडवलदारांच्या हितासाठी देशातील जनतेला वेठीस धरून सामान्य जनतेच नुकसान करण्याचे काम केंद्र सरकार जाणीवपूर्वक करत आहे. सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी हे पर्दाफाश आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी शहराध्यक्ष आकाश छाजेड, नाशिकरोड ब्लॉक अध्यक्ष दिनेश निकाळे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील, महिला काँग्रेस शहराध्यक्ष स्वाती जाधव, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष हानीफ, बशीर प्रदेश सरचिटणीस जावेद इब्राहिम, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, एन एस यु आय जिल्हाध्यक्ष अल्तमस शेख, मा.नगरसेविका वत्सला खैरे, शहर सरचिटणीस कामिल इनामदार, सेवादल ब्लॉक अध्यक्ष सिद्धार्थ गांगुर्डे अनुसूचित जाती काँग्रेस अध्यक्ष अरुणा आहेर,अल्पसंख्यांक ब्लॉक अध्यक्ष तोफिक शेख,महिला काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष कुसुम चव्हाण, तालुकाध्यक्ष शाहिद शेख संतोष हिवडे,जावेद पठाण राहुल बागुल,उमेश चव्हाण उमेश दासवानी, सदाशिव बोराडे दाऊद शेख, अनिल बहोत,सुभाष हिरे, संतोष गिरजे, तन्वीर शेख, अकबर खान,अखिल कादरी, गुड्डी आप्पा खान, सोफिया सिद्दिकी, समीना पठाण, साजिया खान, वाजिदा मिर्झा, लता शहरकर, संतोष नेहे आदिसह नागरिक उपस्थित होते.