Thursday, June 1, 2023
Homeताज्या बातम्याहिंदू एकता आंदोलन पक्षा तर्फे हिंदू तिथीने शिवजयंती साजरी,साधू संतांच्या साक्षीने काढण्यात...

हिंदू एकता आंदोलन पक्षा तर्फे हिंदू तिथीने शिवजयंती साजरी,साधू संतांच्या साक्षीने काढण्यात आली भव्य मिरवणूक.

58 Views

हिंदू एकता आंदोलन पक्षा तर्फे हिंदू तिथीने शिवजयंती साजरी…..
साधू संतांच्या साक्षीने काढण्यात आली भव्य मिरवणूक…..

नाशिक जिल्हा व शहरात हिंदू एकता आंदोलन पक्ष प्रणित शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळ तर्फे तिथी नुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. शेकडो वर्षांपासून संपूर्ण हिंदू समाज शिवरायांची जयंती तिथी नुसार साजरी करत असून यंदाही मोठ्या जल्लोषात जयंती साजरी करण्यात आली. शहरातील मुख्य चौक असलेल्या शहीद भगतसिंग चौक, द्वारका सर्कल येथे शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार हिंदू एकताचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र कानडे, विशाल पवार, अर्जुन पगारे, हेमंत गोडसे, सुनील परदेशी, पप्पू टिळे, सुरेश पवार, आसिफ मुलाणी, बबलू शेख, शशी हिरवे सह आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी संपूर्ण चौकात भगवे ध्वज, पताका लावून भगवे वातावरण निर्माण करण्यात आले होते तसेच लायटिंग लावून संपूर्ण परिसर प्रकाशमय करण्यात आला होता. यावेळी उत्सव समिती अध्यक्ष करणसिंग बावरी यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्याचा स्वागत सत्कार करण्यात आला. त्यानंतर शिवरायांची आरती करण्यात आली. लहान मुलांनी शिवरायांचे पोवाडे गायले. हिंदू एकता नेहमी शिवजयंती दिनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व पुतळ्यांना आणि इतर महापुरुषाच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करते. म्हणुन सकाळी ९ वाजेपासून शहरातील नाशिकरोड, सिबीएस, शालिमार, मालेगाव स्टँड, पंचवटी येथील सर्व पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.

सायंकाळी चार वाजता शहीद भगतसिंग चौक द्वारका येथून पारंपारिक मार्ग वाकडी बारव या मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये पंधरा फुटाची शिवरायांची अश्वारोड मूर्ती प्रमुख आकर्षण ठरली तर मर्दानी खेळांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संतोषगिरी महाराज तसेच उपस्थित अन्य मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून. मिरवणुकीची सुरवात करण्यात आली. या वेळी महंत बालकदास महाराज, महंत परमचरणदास महाराज, महंत रामायणदास महाराज, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार, बाळा पाठक, रामसिंग बावरी, मामा राजवाडे, करणसिंग बावरी, बबलू परदेशी, जगन पाटील, श्याम पवार, बापू बैरागी आदी उपस्थित होते. यावेळी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हजारो नागरिक या भव्य मिरवणूक मध्ये सहभागी झाले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हिंदू एकता शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष करणसिंग बावरी, किरणसिंग पवार, उमेश पाटील, अतुल रयसिंगे, अनिल जाधव, स्वप्नील काथवटे, प्रसाद दादा बावरी, महादु बेंडकुळे, प्रतापसिंग पवार, काशिनाय बेडकुळे, राजेश तेलंग, मोहन पवार, बब्बु शेख, बाळासाहेब मोरे, बाळासाहेब थोरात, राजेश धूमाल, आदित्य भालेराव, कृष्णा पवार, काशिनाथ बंडकुळे, अभिजित राजपूत, शिवा पवार, देवा पवार, प्रेम पवार, करन राजपूत, नितीन खैरनार, अशोक गांगुर्डे, नितीन काठवते, राजू गाडगीळ, राज शेट्टी, रोशन जाधव,भारत सदभैय्या, कैलास बनकर, संतोष जोशी, कृष्णा आवटी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पवार यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments