Thursday, June 1, 2023
Homeक्राइमतीन लाख रुपये लाचेची मागणी करणाऱ्या भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील तिघांवर लाचलुचपत...

तीन लाख रुपये लाचेची मागणी करणाऱ्या भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील तिघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

50 Views

तीन लाख रुपये लाचेची मागणी करणाऱ्या भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील तिघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

 

शर्मिष्ठा वालावलकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर लाचखोरांविरोधात चांगलीच मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत. आज अशीच एक मोठी कारवाई त्यांनी केली आहे.

तब्बल १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती ३ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्या प्रकरणी त्र्यंबकेश्वर भूमी अभिलेख उप अधीक्षक कार्यालयातील २ जणांसह एका खासगी इसमाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.

त्र्यंबकेश्वर उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील शिरस्तेदार दौलत नथू समशेर (वय ४३, रा. फ्लॅट नं ६, चैत्र चंद्र अपार्टमेंट, समर्थ नगर, वडाळा पाथर्डी रोड, इंदिरा नगर, गोकुळ हॉस्पिटल जवळ, नाशिक), भूकरमापक भास्कर प्रकाश राऊत, (वय ५६, रा. रो हाऊस नं ३, ४, रामकुंज अपार्टमेंट, रामकृष्ण नगर, राम मंदिर जवळ, चुनचाळे शिवार, अंबड नाशिक) व वैजनाथ नाना पिंपळे, (वय ३४, रा. रो हाऊस नंबर १, ऋषिराज रो हाऊस, शांतीनगर, मखमलाबाद रोड, नाशिक) अशी लाच मागणाऱ्या तिघांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे फायनल लेआउट मध्ये त्रुटी दाखवून शेजारील गटातील क्षेत्र तक्रारदार यांचे गटात सरकून न देण्याच्या मोबदल्यात समशेर व राऊत यांनी तक्रारदारकडे २९ डिसेंबर २०२२ रोजी १०लाख रुपये लाचेची मागणी केली.तक्रारदार तयार न झाल्याने ११ जानेवारी २०२३ रोजी ६ लाख रुपये लाच मागितली शेवटी तडजोडी अंती १६ जानेवारी २०२३ रोजी ३ लाख रुपयांची लाचेची मागणी करून पिंपळे याने ही लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाच मागितल्याची खात्री झाल्यावर वरील तिघांवर कारवाई करण्यात आली.

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments