Home ताज्या बातम्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना स्मृतिदिनी अभिवादन

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना स्मृतिदिनी अभिवादन

0

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना स्मृतिदिनी अभिवादन

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे व बाबासाहेबांचे उजव्या हात समजले जाणारे पद्मश्री, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची 52 वा स्मृतिदिना निमित्ताने पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या हस्ते जेलरोड नाशिकरोड या ठिकाणी दादासाहेब गायकवाड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी दादासाहेब अमर रहे या घोषणा देऊन अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांनी दादासाहेबांच्या कार्याचा गौरव केला त्यामध्ये नाशिकच्या काळाराम सत्याग्रहापासून ते इथल्या ओझर येथील एच ए एल कारखाना बांधणी तसेच नाशिकरोडच्या नोट प्रेस येथील कामगारांची चळवळ अशा माध्यमातून आंबेडकरी चळवळ उभी आणि भक्कम केली त्यामुळे दादासाहेबांचं काम हे सर्वांना प्रेरणादायी ठरणारेच आहे. ओझर येथील विमानतळाला पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचेच नाव सरकारने तात्काळ द्यावे अशी मागणी यावेळी गणेशभाई उन्हवणे यांनी केली.

यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे जावेद शेख,अबिद शेख, हारून टकारी,बिलाल शेख,रवी पगारे,शिरीष गांगुर्डे,शरद सोनवणे,मनोज अहिरे,गोविंद शिंगाडे,रमेश पाईकराव,विनोद जाधव,तुषार घोडके,योगेश गांगुर्डे,राहुल शिंदे,सुनिता कर्डक, गयाबाई काळे,निर्मला सोनावणे, मालन समदुर,रिटा बारसे,आदी महिला पुरुष कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version