स्कूल बसच्या धडकेत आठ वर्षाच्या बालिकेचा मृत्यू
नाशिक रोड येथील जेल रोड परिसरात असलेल्या पवारवाडी येथे एका स्कूल बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात आठ वर्षाची शाळकरी बालिका ठार झाल्याचे दुर्दैवी घटना घडली असून या प्रकारामुळे जेल रोड व पवारवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात स्कूल बस चालकाविरुद्ध तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपेक्षा नवज्योत भालेराव वय आठ वर्ष राहणार पवारवाडी जेल रोड असे अपघातात ठार झालेल्या बालिकेचे नाव असून अपेक्षा ही जल रोड पेंढारकर कॉलनी येथे असलेल्या नवीन मराठी शाळेत शिकत होती तिला स्कूल बस क्रमांक एम एच 15 जी व्ही 35 42 ही गाडी घरी सोडण्यासाठी आली असता घरी सोडल्यानंतर गाडी चालकाने अचानकपणे गाडी जोराने रिव्हर्स मागे घेतले त्यामुळे पाठीमागे असलेली अपेक्षा तिला बसची जोरदार धडक बसल्याने ती पाठीमागील टायर खाली सापडले त्यामुळे ती गंभीर जखमी झाली त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला या घटनेनंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यात प्रशिक विजय भालेराव यांनी बस चालक प्रवीण शेजवळ याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबत पुढील तपास सुरू आहे. या अपघातामुळे जेलरोड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.