पाणी प्रश्र्नी नाशिक रोड विभागीय अधिकारी यांना निवेदन….
उन्हाळा आला की शहरात अनेक भागात पाणी प्रश्न निर्माण होतात. प्रभाग क्र 20 मधील माजी नगरसेविका सिमा ताजने तसेच प्रभागातील महिला व नागरिकांनी नाशिक मनपा नाशिक रोड विभागीय कार्यालयात विभागीय अधिकारी सौ. जयश्री बैरागी यांना आज पाणी प्रश्र्नि निवेदन दिले. गेल्या पाच सहा दिवसापासून प्रभागामध्ये पाण्याची टंचाई जाणवत असल्याकारणाने महिलांमध्ये गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. या माध्यमातून प्रभाग क्रमांक 20 मधील माजी नगरसेविका डॉक्टर सीमा ताजने यांच्या पुढाकाराने विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांना निवेदन देण्यात आले .यामध्ये पाण्याच्या समस्या यावर सविस्तर चर्चा करून दोन दिवसात पाण्याचे नियोजन करून देण्याची ग्वाही विभागीय अधिकाऱ्यांनी दिली यावेळेस प्रभाग क्रमांक 20 मा नगरसेविका डॉक्टर सीमा ताजने तसेच मित्रमेळा युवक मंडळ संस्थापक राजेंद्र कन्नू ताजने, प्रेस कामगार नेते बाळासाहेब अरिंगळे, ज्येष्ठ नागरिक संघांचे धर्मा पाटील साहेब, मनोज पवार साहेब, सुदामतात्या ताजनपुरे, महावितरण सुप्रिडेंट माणिक गुट्टे साहेब, झूलेलाल ट्रस्टचे हरिशेठ देवानी, सौं सुप्रिया लोकरे, सौं भारती रामराजे, सौं रंजना डोईफोडे, सौं लता गायधनी, सौं सुनीता चकोर, सौं पुष्पलता अरिंगळे,विलास थोरात,दिनकर झाडे, विलास चतुर, रमेश पाकळदे, सचिन सूर्यवंशी, रिंकू हातकर, अन्नू पुजारी, शरद गुंजाळ, मधुकर भोर, अकील काद्री आणि पदाधिकारी व महिला उपस्थित होते…….