Thursday, June 1, 2023
Homeताज्या बातम्याशासकीय योजना गोर गरीब व गरजवंताना मिळवून यासाठी प्रयत्न करणार : युनूस...

शासकीय योजना गोर गरीब व गरजवंताना मिळवून यासाठी प्रयत्न करणार : युनूस शेख

167 Views

शासकीय योजना गोर गरीब व गरजवंताना मिळवून यासाठी प्रयत्न करणार : युनूस शेख

मानवता विकास सेवा संस्थेची जिल्हा वैठक शनिवार २५ फेब्रुवारी रोजी पार पडली. मिटींगचे अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष युनूस शेख सर होते. आनंद धिवरे यांनी प्रस्ताव मांडले तर सुरेखा कुशारे यांनी अनुमोदन देवून मिटींगला सुरूवात करण्यात आली. संस्थेचे आनंद धिवरे यांनी कार्यक्रमाची धुरा संभाळली धिवरे यांनी संस्थेचे मुख्य उध्दीष्ट याबाबत सविस्तर माहिती दिली. संस्थेचे उपाध्यक्ष पदमाकर भालेराव सर यांनी आपले विचार मांडताना संस्थेला पुढील काळात करावयाच्या कामाविषयी मार्गदर्शन केले.

सी. सुरेखा कुशारे यांनी संस्थेला प्रगतीपथावर नेण्याविषयी आपले विशेष मत मांडतांना संस्थेच्या प्रत्येक सभासदाला न्याय देणे या विषयी मत मांडले. संस्थेचे खजीनदार डॉ. गालीव कुरेशी यांनी काम करताना सर्वांना समान न्याय देण्यावर भर दीला. नासीर खान व अब्दुल कादीर सर यांनी संस्थेच्या कामासंदर्भात आपले मत व्यक्त करतांना संस्थेत काम करताना शिस्तीला विशेष महत्व असल्याचे स्पष्ट केले तसेच निफाड येथील सामाजीक कार्यकर्ते व जमीर सैय्यद यांनी संस्थेच्या कामाविषयी आपले मत व्यक्त. अर्चना जाधव यांनी काम करताना महिलांना येणाऱ्या अडचणी विषयी मत व्यक्त केले. अर्पना जाधव यांनी संस्थेच्या कार्यात नव्याने सहभागी झालेल्या सभासद व पदाधिकारींना शुभेच्छा दील्या. रूपाली झगडे यांनी संस्थेच्या कामात एकमेकांचे सहकार्य अपेक्षीत असल्याचे सांगितले. शर्मा मॅडम यांनी संस्थेत काम करताना एकमेकांच्या सहकार्यावर विशेष भर दीला. अमजद पठाण व अशपाक कुरेशी तसेच गुलाम शेख यांनी मिटींग पार पाडण्यासाठी विशेष सहकार्य केले.

 

अध्यक्ष युनूस शेख यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या कामाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच संस्थेत काम करतांना एकमेकांना सहकार्य करणे व महिला वर्गाचा आदर करण्यावर भर दीला. गोर गरीब व गरजवतांना आवश्यक त्या शासकीय सोयी सुवीधा व योजना पुरविण्याबाबत प्रत्येक पदाधिकारी व सभासदांना मार्गदर्शन करीत हेच आपल्या संस्थेचे मुख्य उध्दीष्ट असल्याचे स्पष्ट केले. संस्थेत काम करताना शिस्तीला विशेष महत्व असल्याचे अध्यक्षांनी सांगीतले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मिटींग पार पडली. नाशिकरोड दसक येथील सदगुरू हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला सन्मानीय पदाधिकारी व सभासद हजर होते. कार्यक्रमास जिल्ह्यातील पदाधिकारी व सभासद उपस्थितीत होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments