डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती अध्यक्ष बाळासाहेब भालेराव.
नासिक रोड डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक आज नासिक रोड येथील बौद्ध विहारात माजी अध्यक्ष संतोष पाटील यांच्या अध्यक्षते खालील संपन्न झाली. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल 2023रोजी साजरी होणार आहे. दरवर्षाप्रमाणे साजरी होणाऱ्या जयंती निमित्त शनिवारी नासिक रोड येथील बुध्द विहारात झालेल्या बैठकीत भीम सैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
बैठकीत सर्वानुमते अध्यक्षपदी बाळासाहेब भालेराव यांची आज निवड करण्यात आली. नासिक रोड येथील बुध्द विहारात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षपदी बाळासाहेब भालेराव तर उपाध्यक्ष अनिस खान कार्याध्यक्ष पदी सनी पगारे, अजय बागुल यांची घोषणा करण्यात आली. यावेळी सनी वाघ, पवन पवार, संतोष कांबळे, समीर शेख, संजय भालेराव, भारत निकम, राम बाबा पठारे, राजा भाऊ वामखेडे, दिनेश दासवानी,आकाश भालेराव,राहुल बोर्डे संतोष अहिरे यावेळी भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते