एम डी कारवाई दरम्यान नाशिकरोडला गाजलेला जुगार अड्डा पुहा सुरू…..
मुंबई पोलिसांनी नाशिक रोड हद्दीतील शिंदे गावात मोठी कारवाई करीत ड्रग्स चा कारखाना उद्ध्वस्त करून कोट्यवधींचे ड्रग्स जप्त केले होते. त्याच वेळेस नाशिकरोड पोलिस ठाणे समोर हाकेच्या अंतरावर आणि इतर ठिकाणी असलेले जुगार अड्डे सुरू असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्यात येऊन ते बंद करण्यात आले होते. तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशिक शहरात पदभार स्वीकारल्यानंतर जुगार अड्या बाबत कठोर भूमिका ठेवली होती. एम डी प्रकरण आणि जुगार अड्डे कारवाईनंतर पोलिस निरीक्षक देविदास वांजळे यांची बदली करण्यात आली होती. नाशिक शहराच्या पोलिस आयुक्त पदी संदीप कर्णिक यांची नियुक्ती झाली.
नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या समोर आता पुन्हा जोमाने जुगार अड्डे सुरू झाला असून यांना कुणाचा वरदहस्त हे गूढच आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात नवे आलेले डॉशींग पोलिस निरीक्षक रामदास शेळके याकडे लक्ष देतील अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत कारण नुकतेच रामदास शेळके यांनी मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या दोन पोलिसांच्या विरुद्ध कारवाई केली आणि रात्री भररस्त्यात वाढदिवस साजरा करून धिंगाणा घालणाऱ्या ॲम्बुलन्स चालकाला चोप देऊन कारवाई केली होती या कारवाईने नागरिकांमध्ये पोलिसांची छबी सकारात्मक झाली आहे पण आता जर जुगार अड्डे पुन्हा सुरू होऊन त्याच फायदा कुणाचाही असो पण दर्शभरापासून बंद असलेले जुगार अड्डे पुन्हा नको अशी नागरिकांची भूमिका आहे.