गोरेवाडी परिसरातील गुन्हेगारी बाबत पोलिसांना सर्वपक्षीय निवेदन…..
गोरेवाडी परीसरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली असुन रोज, काहीना कुठल्या ना कुठल्या प्रकारचे अपराध- चोरी घरफोडी. हत्यार घेऊन दहशत माजवण्याचा प्रकार सुरूच आहेत. काही दिवसा पूर्वी गोरेवाडी शास्त्री नगर येथे काही युवकांनी हातात तीक्ष्ण हत्यारांनी कदम यांचे घर फोडुन घरातील सामानांची तोड फोड केली होती. कुठल्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यामुळे संबंधीत गुन्हेगार हे मोकाट फिरतांना दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये दहशत असून पोलिसांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. कुठल्याही प्रकारची कारवाई आरोपींवर होत नाही याची खामी बाळगुन गुन्हेगारांचे मनोबल दिवसेंदिवस वाढल्याने पुन्हा काल रात्री टोळक्याने एका घरावर हल्ला करून निखिल कदम याच्या वर धारधार हत्याराने हल्ला करून कदम या युवकास जबर जखमी केले आहे.
गोरेवाडी परिसरात अनेक चोऱ्या घरफोड्या झालेल्या असून कुठल्याच प्रकारचा छडा सीसीटीव्ही फुटेज असुनही लागत नाही या सर्व प्रकरणा मुळे गोरेवाडी परिसरातील नागरिक भयभित झाले असून संबधीत गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी हरीश भडांगे, संतोष कांबळे, किशोर जाधव, संदीप काकडीज, सुरेश निकम, सागर जाधव आणि सर्व पक्षीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्त व्यापारी वर्ग य स्थानिक रहिवाशांनी केली आहे.