मालेगाव शिवारातील महीलेचा निर्घृण खून करणारा मारेकरी जेरबंद….. नाशिक ग्रामीण पोलीसांची कामगीरी
मालेगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीतील दहिंदी गावचे शिवारातील पाणताची शेवडी परीसरातील सुमनबाई भास्कर बिचकुले, वय २८ वर्षे महिलेचा 30 जानेवारी रोजी धारदार हत्याराने खून करून पूरावा नष्ट करण्यासाठी तीचे प्रेत वन जमीनीत दगड व मातीखाली लपविले होते. मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात भादवि कलम ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली
घटनास्थळावर फॉरेन्सीक टीम व श्वान पथकास पाचारण करण्यात आले. पोलीस पथकांनी अहोरात्र प्रयत्न करून घटनास्थळी मिळून आलेले भौतिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शीने बघीतलेल्या आरोपीचे वर्णनावरून अज्ञात मारेक-याचा शोध सुरू केला. यातील संशयीत आरोपीचे वर्णन व त्याने परिधान केलेल्या कपडयांवरून मिळालेल्या माहितीप्रमाणे तो डोंगराळे गावचे शिवारात असल्याची खबर मिळाली. पोलीस पथकाने डोंगराळे गावाजवळील तलावात धाव घेऊन संशयीत आरोपीचा पाठलाग केला असता त्याने बाजूचे तलावात उडी मारली, त्यास पोहता येत नसल्याने तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागल्याचे पाहिल्यावर लागलीच पोलीस अंमलदार शरद मोगल व दत्ता माळी यांनी जीवाची पर्वा न करता तलावात उड्या टाकून त्यास पाण्याबाहेर काढले. किरण ओमकार गोलाईत, वय ३२, रा. शेजवाळ, ता. मालेगाव, जि नाशिक असे या सायांशिताचे नाव आहे. ३० जानेवारी l रोजी दुपारचे सुमारास दहिदी गावचे वनजमीनीलगत असलेल्या शेतात निर्जनस्थळी एक महीला एकटीच काम करत असल्याचे पाहून, तीला पाणी पिण्याचे व मोरेवाडी गावाचा रस्ता विचारण्याचे बहाण्याने जवळ बोलावून तीचे अंगावरील सोन्याचांदीचे दागिने चोरण्याचे उद्देशाने तीचेशी झटापट करून तीचा साडीने गळा आवळून व फावडयाने वार करून तीला जीवे ठार मारले होते. त्यानंतर तिच्या गळ्यातील सोन्याची पोत व हातातील चांदीच्या पाटल्या काढून घेतल्या व पायातील चांदीचे वाळे काढण्यासाठी तिथे पाय फावड्याने तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र पाय न तुटल्याने त्याने सदर महीलेचे प्रेत त्याचे मोटर सायकलवर टाकून सुमारे १ कि.मी. दूर अंतरावर वनजमीनीतील नाल्यात घेवून गेला. सदर ठिकाणी प्रेत टाकून त्याने महिलेच्या अंगावरील कपडे काढून घेतले व काही अंतरावरील पाण्याच्या डबक्यात टाकून दिले. त्यानंतर तो सुमारे ४ कि.मी. अंतरावरील करंजगव्हाण या गावी गेला व तेथून एक कोयता खरेदी केला. कोयता घेवून हे पुन्हा घटनास्थळी आला व मयताचे दोन्ही पाय घोट्यापासून कापून त्याने तिच्या पायातील चांदीचे वाळे काढून घेतले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने सदर महीलेचे प्रेत व तोडलेला एक पाय त्याच ठिकाणी दगड व मातीखाली गाडून टाकला व एक पाय मुडूत फेकून दिला आल्याची कबुली दिली. सदरची उलेखिनिय कामगिरी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण विभाग पुष्कराज सूर्यवंशी यांनी केलेले मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक मयुर भामरे, सहायक पोलिस उप निरीक्षक रविंद्र वानखेडे, जालिंदर खराटे, नवनाथ सानप, शरद मोगल, नवनाथ वाघमोडे, सुशांत मरकड, सुभाष चोपड़ा, फिरोज पठाण, • पोकों दत्ता माळी, योगेश कोळी, बापु खांडेकर यांच्या पथकाने तसेच मालेगाव तालुका पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या सहका-यांनी केली आहे.