दिंडोरी ढकांबे येथील दरोडयाचा गुन्हा उघडकीस आणण्यात ग्रामीण पोलीसांना यश……आंतरराज्यीय टोळीतील चार दरोडेखोर अटकेत…
दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 12 नोव्हेंबर रोजी ढकांबे गानोरी शिवारातील शेतकरी रतन शिवाजी बोडके यांच्या मालकीच्या शिवकमल बंगल्यात मध्यरात्रीचे सुमारास अज्ञात ६ इसमांनी प्रवेश करून बंदूक व चाकूचा धाक दाखवून सोन्याचांदीचे दागीने व रोख रक्कम ८,५०,०००/- रुपये असा एकूण १७,३४,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल दरोडा टाकून चोरून नेला होता. दिंडोरी पोलीस ठाण्यात भादवि कलम ३९५ ३४२ ५०४, ५०६ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण विभाग श्रीमती कविता फडतरे यांनी सदर वस्तीवरील दरोडयाचा प्रकार गांभीर्याने घेवून घटनास्थळी भेट देवून ३ वेगवेगळी पथके तयार करून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास पथकांना सूचना दिल्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या पथकांनी वरील गुन्हयातील प्रत्यक्षदर्शीने बघितलेल्या आरोपींचे वर्णनावरून, तसेच घटनास्थळी मिळून आलेले भौतिक पुरावे उपलब्ध पुराव्यांचे तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहीती मिळवून नौशाद आलम फजल शेख, वय २५, रा. पंचशीलनगर झोपडपट्टी, नाशिक-पुणे रोड, नाशिक या सायांशीतास रात्रभर पाळत ठेवून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने त्याचे नाशिक शहर व मध्यप्रदेश राज्यातील साथीदारांसह त्यांचेकडील सफेद रंगाये स्विफ्ट डिझायर कार व दुचाकीवर दिंडोरी रोडने ढकांबे मानोरी परिसरात जावून एका अलिशान बंगल्यात दरोडा टाकून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आल्याची कबूली दिली. रेहमान फजल शेख, रा. राहुलनगर, जेलरोड, नाशिक, इरशाद नईम शेख, रा. संजेरी रो-हाऊस, राजराजेश्वरी मंगल कार्यालय शेजारी, जेलरोड, नाशिक, लखन बाबूलाल कुंडलिया, रवि उर्फ लालू देवीलाल फुलेरी, इकबाल खान फारून खान, सर्व रा. रसुलपूर, देवास, जि. देवास, राज्य मध्यप्रदेश व भुरा उर्फ पवन रतन फुलेरी, रा. इंदोर, राज्य मध्यप्रदेश ते इतर आरोपी आहेत. यातील आरोपी क. २ ते ४ यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेवून त्यांचे कब्जातून वरील दरोडयाचे गुन्हयात चोरून नेलेले दागिन्यांपैकी १६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने किंमत रु. ४,६०,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. आरोपीतांविरुद्ध महाराष्ट्र राज्यातील धुळे, औरंगाबाद, पुणे, नाशिक जिल्हयात तसेच मध्यप्रदेश राज्यात दरोडा, जबरीचोरी व चोरी यासारखे मालाविरुध्दचे अनेक गुन्हे दाखल आहेत. वरील गुन्हयाचे तपासात यातील आरोपीतांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून यातील फरार आरोपींचा पोलीस पथक कसोशीने शोध घेत आहे. गुन्हयाचा पुढील तपास दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे करत आहेत.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे, कळवण उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती कविता फडतरे यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलिस उप निरीक्षक अमोल पवार, पोलिस उप निरीक्षक नाना शिरोळे, सहायक पोलिस उप निरीक्षक रविंद्र वानखेडे, नवनाथ सानप, जालिंदर खराटे, विश्वनाथ काकड, सुशांत मरकड, बाळासाहेब पानसरे, धनंजय शिलावटे, हेमंत गिलबिले, किशोर सानप, मंगेश गोसावी, प्रदिप बहिरम यांच्या पथकाने दरोडयाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी परिश्रम घेतले. पोलीसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक शशहाजी उमाप यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.