शिवजन्मोत्सव सोहळा भव्य दिव्य देखावा व रंगमंचाचे भुमिपुजन संपन्न
दरवर्षीप्रमाणे आगामी साजरी होणाऱ्या सर्वपक्षीय नाशिक रोड शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमात साजरा केला जाणारा असून शिवकार्याची स्मृती येणारा प्रेरक स्फूर्तीदायक भव्य दिव्य देखाव्याचे व रंगमंचाचे भूमिपूजन रविवार २९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता संपन्न झाले.
आज संपन्न झालेल्या भूमिपूजनला ज्येष्ठ सभासद व शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष कृष्णा लवटे, कार्याध्यक्ष शांताराम घंटे यांच्या हस्ते करण्यात आले.
धर्मवीर चित्रपटाचे कला दिग्दर्शक नितेश नांदगावकर व गणेश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य किल्ला तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागे आई तुळजभवानीची भव्य प्रतिकृती उभारली जाणार आहे. १६ फेब्रुवारी पर्यंत देखाव्याचे काम पूर्ण होणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती भव्य स्वरुपात साजरी करण्यात येणार असून विविध कार्यक्रम व उपक्रम होणार आहेत.
भूमीपूजनावेळी आमदार सरोज आहिरे, माजी आमदार योगेश घोलप, समितीचे उपाध्यक्ष राहुल वाजे, लक्ष्मण ढोकणे, सरचिटणीस प्रशांत आवारे, चिटणीस सागर भोर, खजिनदार रवि करजेकर, प्रसिध्दीप्रमुख शंतनु निसाळ, दत्ता गायकवाड, निवृत्ती अरिंगळे, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, हेमंत गायकवाड, सुनील आडके, साहेबराव खर्जुल, माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, विशाल संगमनेरे, केशव पोरजे,शरद मोरे, शिवाजी सहाणे, उत्तम कोठुळे, रमेश धोंगडे, शाम खोले, अजिंक्य गोडसे, पंडित आवारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या भूमिपूजन सोहळ्यात शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी, सभासद, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.