भारतीय लष्कराच्या तोफखाना दलाचे शत्रूच्या उरात धडकी भरविणाऱ्या सामर्थ्याचे प्रदर्शन…
चाल करून येणाऱ्या शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी नाशिकच्या देवळाली येथील स्कुल ऑफ आर्टीलरीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तोपची कार्यक्रमात तोफांचा थरार बघावयास मिळाला. यादरम्यान, शत्रूचा अचूक वेध घेत या तोफांनी उपस्थितांनी मने जिंकली. यावेळी लष्कराचे रणगाडे, रॉकेट्स, मिसाईल लक्ष्य प्राप्ती रडार, मनुष्य रहित विमान यांच्यासह लष्कराच्या हायटेक टाकतीचे दर्शन घडले.
आत्मनिर्भर भारत’द्वारा प्रेरित होऊन स्वदेशी निर्मित वज्र, धनुष, उखळी मारा करण्याची क्षमता असलेली आधुनिक हलकी होवित्झर (एम-७७७), इंडियान फिल्ड सॉल्टम (१५५ एम.एम) यांसह आधुनिक बोफोर्स, १०५ एम.एम हलकी तोफ, १३०एम.एम उखळी तोफ, पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर अशा नऊ तोफांद्वारे युद्धभूमीवरील प्रत्यक्ष थरार देवळाली गोळीबार मैदानावर अनुभवयास आला. या तोफांनी अवघ्या काही सेकंदात निश्चित केलेले लक्ष्य अचूकपणे भेदले.
नाशिक येथील देवळाली फिल्ड फायरिंग रेंज येथे झालेल्या तोफखाना प्रात्यक्षिकात भारतीय तोफखाना दलाच्या विविध तोफांनी 11 किलोमीटर असणाऱ्या डोंगराच्या कुशीतील लक्षावर अचूक मारा करीत भारतीय तोफखाना दलाच्या युद्ध सज्जतेचे दर्शन घडविले भारतीय तोफखाना दलाच्या स्कूल ऑफ आर्टिलरी अर्थात तोफखाना प्रशिक्षण केंद्रामार्फत आयोजित युद्ध सरावादरम्यान तोफखाना दलातील विविध तोफांबरोबर हेलिकॉप्टर तसेच रॉकेट लॉंचर प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली.