देशी पिस्तूल बाळगणारा एक अटकेत….
शहरात सुरू वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश घालण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कठोर पावले उचलली आहेत. गुन्हेगारांवर नजर ठेऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. खंडणी विरोधी पथकातील स्वप्नील बाळासाहेब जुंद्रे यांना
२१ जानेवारी रोजी एक इसम वसंत विहार, साईबाबा मंदिरा जवळ, जेलरोड, नाशिक रोड, नाशिक येथे गावठी बनावटीचे पिस्तोल व जिवंत काडतुसे असे विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली. खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक सुर्यवंशी यांना कळविले. त्वरित सहायक पोलिस निरीक्षक पी.बी सुर्यवंशी यांनी गुन्हेशाखा युनिट क. १ पोलीस मुख्यालय नाशिक शहर येथील कार्यालयात पोलीस पथकातील पोलिस उप निरी्षक डी. सी भोई, सहायक पोलिस उप निरीक्षक डी आर सगळे, के जी रोकडे, आर एस भदाणे, बी. ए. जाधव, डी. डी. चकोर, एम पी जगझाप दोन पंचांसोबत वसंत विहार येथे कडेला थांबवून गाडीतुन खाली उतरुन सापळा लावून थांबले असताना एक इसम समर्थ अपार्टमेंटचे समोरील रोडवरुन पायी येवुन थांबला व तो कोणाची तरी वाट पाहत असल्याचे दिसुन आले. सोबत आलेल्या गुप्त बातमीदाराने त्याचेकडे अंगुली निर्देश केला असता पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी
सोहिल अमजद पठाण वय १९ वर्षे रा- पवारवाडी, सुभाष रोड, नुरीया सुन्नी मजित समोर, नाशिक रोड यास पकडुन अंगझडती घेतली असता त्याचे डाव्या बाजुच्या कंबरेजवळ पॅन्टच्या आतमध्ये एक देशी पिस्टल मॅग्झीनसह एक जिवंत काडतुस मिळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत काकड करीत आहे.