देवळाली गाव गोळीबार प्रकरण माजी नगरसेवक विरुद्ध तक्रार
नाशिक रोड प्रतिनिधी गुरुवारी रात्री देवळाली गाव येथे शिवजन्मोत्सव समितीच्या बैठकी प्रसंगी शिंदे गट व ठाकरे गट यांच्या शिवीगाळ धक्काबुक्की व त्यानंतर हवेत गोळीबार करण्याचा प्रकार घडला होता सदरचे प्रकरण अद्यापही शांत झालेले नाही दरम्यान या घटनेप्रकारे उपनगर पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांचा पुत्र स्वप्निल लवटे यास अटक करण्यात आली असून सध्या तो अटकेत आहे. दरम्यान या प्रकाराला आता नवीन कलाटनी मिळाली असून माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भैय्या मणियार व त्यांच्या दोन सहकार्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
या संदर्भात सूर्यकांत लवटे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की गुरुवारी सायंकाळी शिवजन्मोत्सव समितीची बैठक चालू असताना भैय्या मनियार प्रशांत जाधव सागर कोकणे व त्यांचे 80 ते 100 कार्यकर्ते आले व शिवजन्मोत्सव समितीच्या हिशोब मागण्याच्या कारणावरून हातात कोयते व तलवार लाट्या-काठ्या घेऊन आपणास शिवीगाळ करून दमदाटी केली तसेच गर्दीत कुणीतरी अज्ञात आरोपीने पिस्तोल मधून फायर केले असे तक्रारीत म्हटले आहे.
लवटे यांच्या तक्रारीनुसार उपनगर पोलीस ठाण्यात मनियार व प्रशांत जाधव सागर कोकणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.