Saturday, February 4, 2023
Homeराजकारणमाजी नगरसेवक भैय्या मणियार यांच्यासह भाजपा मनसेतील अनेकांचा ठाकरे गटात प्रवेश

माजी नगरसेवक भैय्या मणियार यांच्यासह भाजपा मनसेतील अनेकांचा ठाकरे गटात प्रवेश

192 Views

माजी नगरसेवक भैय्या मणियार यांच्यासह भाजपा मनसेतील अनेकांचा ठाकरे गटात प्रवेश

शिवसेना माझी नगरसेवक अस्लम भय्या मणियार हे पुन्हा स्वगृही परतले असून त्यांच्या सोबत शेकडो कार्यकर्ता यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला.माजी नगरसेवक असलम मनियार हे पूर्वी शिवसेनेचे नगरसेवक होते. शिवसेनेत असलेल्या गटबाजीला कंटाळून त्यांनी गेल्यावर्षी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मात्र काही महिन्यांपूर्वी सत्तांतर झाल्याने राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे हे विराजमान झाले. त्यानंतर मूळ शिवसेनेतील अनेक आमदार, खासदार, पदाधिकारी व नगरसेवक शिंदे यांच्या गटात सामील झाले.

त्याचप्रमाणे गेल्याच महिन्यात नगरसेवक सूर्यकांत लवटे यांच्यासह नाशिक रोड मधील पाच नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. असलम मणियार यांनी पुन्हा शिवसेनेत परतण्याचा विचार केला.
शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनी त्यांच्यासोबत दोन ते तीन बैठका घेऊन शिवसेनेत येण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले. त्यामुळे आज असलम मनियार यांच्यासह देवळाली गाव येथील प्रशांत जाधव त्याचप्रमाणे भाजपचे पदाधिकारी योगेश भोर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे नाशिकरोड भाजपाला एक प्रकारे मोठे खिंडार पडले आहे.

या प्रवेशाच्या वेळी खा. संजय राऊत, उपनेते सुनील बागुल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, योगेश घोलप, माजी नगरसेवक विलास शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments