अपंग वृद्ध महिलेवर अत्याचार….ज्येष्ठ महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न एरनिवर….
नाशिक जिल्ह्यात एका अपंग वृद्ध महिलेवर रात्रभर अत्याचार केल्याची धक्कादयक घटना घडल्याचे समोर आली असून या प्रकरणी उपनगर पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. दरम्यान या घटनेमुळे ज्येष्ठ महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. संबंधित वृद्ध महिलेवर रात्रभर अत्याचार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार येथील जेतवन नगर परिसरात अपंग वृद्ध महिला एकटीच वास्तव्यास आहे. याची माहिती संबंधित युवकाला असल्याने त्याने नेमका याचाच गैरफायदा घेत तिच्यावर दगडाचा धाक दाखवत अत्याचार केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी संबंधित युवकास ताब्यात घेऊन युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. युवकास अटक झाली असली तरी घटनेचे पडसाद जेतवन नगर परिसराह शहरात उमटू लागले आहेत. नागरिक घटनेबद्दल संताप व्यक्त करीत आहेत…