वंजारी युवा सन्मान स्टुडन्ट समिट 2023 चे उद्घाटन….विद्यार्थ्यांनी कलागुण विकसित केल्यास नक्कीच यश…
नाशिक प्रतिनिधी:- नाशिक मध्ये वंजारी युवा सन्मान स्टुडन्ट समिट 2023 चे उद्घाटन संपन्न झाले.नाशिक असोसिएशन ऑफ प्रोफेशनल च्या वतीने आयोजित वंजारी युवा सन्मान आणि स्टुडंट समीट 2023 चे उद्घाटन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड,
खासदार प्रीतम मुंडे, राज्याचे प्रधान सचिव प्रवीण दराडे आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाल.
मान्यवरांच्या हस्ते मंत्रघोषात दीप प्रज्वलन करून स्टुडन्ट समिट 2023 च्या उद्घाटन संपन्न झाले.
नाशिक मधील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या या वंजारी युवा सन्मान स्टूडेंट समिट 23 कार्यक्रमांमध्ये वंजारी समाजामधील शिक्षण, राजकारण, उद्योग, समाजसेवा विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींकडून विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात वंजारी समाज बांधवांबरोबर सर्वच समाजाचे विद्यार्थीही मोठ्या संख्येने हजर होते.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड म्हणाले की विद्यार्थ्यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात पुढे जाताना केवळ हार्डवर्क नाही तर स्मार्ट हार्ड वर्क केले पाहिजे त्याचबरोबर आपल्या कामा प्रती प्रामाणिकपणा आणि जिद्द आणि त्री सूत्र असल्यास जीवनात नक्कीच यशस्वी होता येऊ शकत.
आज विविध क्षेत्रे विस्तारत आहेत विद्यार्थ्यांनी आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट होण्याचा प्रयत्न करावा तसेच विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित करणाऱ्या संयोजकांनी नाशिक पुरते मर्यादित न राहता आपले कार्य राज्यात विस्तारीत करावे त्यासाठी आवश्यक ते आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल.
सर्वांनी मिळून एकत्रितपणे काम केल्यास समाजाला आणि देशाला पुढे घेऊन जाता येईल. यावेळी मार्गदर्शन करताना बीडच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला प्रत्येकाला आपल्या जातीचा समाजाचा अभिमान असला पाहिजे पण आपल्याला जातीच्या भिंती उभ्या करायच्या नाही. जातीचे फायदे घेत असू तर जाती समाजासाठी आपण काय दिले ते महत्त्वाचे आहे जीवनात पुढे जाण्यासाठी यशस्वी होण्यासाठी मेहनत आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे राज्याचे प्रधान सचिव प्रवीण दराडे मार्गदर्शन करताना म्हणाले की तरुणांनी स्वतःवर विश्वास ठेवून कठोर परिश्रम करायला हवेत कोणतेही आवडीचे क्षेत्र निवडा व मे व मेहनत करा असे सांगताना त्यांनी आजच्या तरुणांनी प्रशासकीय सेवेमध्ये यावे असे सांगितले प्रशासकीय सेवेमध्ये स्वतःचे करिअर घडविण्यासाठी बरोबरच शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत पोहोचता येते असे ते म्हणाले. शैक्षणिक क्षेत्रात नवे प्रयोग करणाऱ्या एमआयटी पुणे या शिक्षण संस्थेचे संचालक राहुल कराड म्हणाले की आजचे युग स्पर्धेचे आहे विद्यार्थ्यांचे कठोर मेहनत घेतली पाहिजे जातीच्या पुढे जाऊन आपण आत्मपरीक्षण करायला हवे राजकारणाच्या क्षेत्रातही चांगले काम करता येते. यावेळी समितीमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले दुपारच्या सत्रात भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रकट मुलाखती द्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विविध क्षेत्रात उत्तम कारकीगिरी आणि यश प्राप्त करणाऱ्या वंजारी समाजातील युवकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हॅलो कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अध्यक्ष उदय घुगे व उपाध्यक्ष प्रशांत आव्हाड सचिव निलेश ढाकणे खजिनदार अविनाश आव्हाड सचिन वैभव आव्हाड अशोक कुटे आणि पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले