१२ वर्षीय मुलाचे अपहरण करणारे आरोपी जेरबंद….पोलिसांनी त्वरित अक्शन घेतल्याने मुलगा सुखरूप परत….. नाशिक ग्रामीण पोलीसांची कामगिरी….
सिन्नर शहरातील काळेवाडा येथून अज्ञात आरोपीने गुरुवार 5 जानेवारी रोजी फिर्यादी तुषार सुरेश कलंत्री यांच्या १२ वर्षीय मुलाचे ओमनी कार मधून अपहरण केले होते. याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात माहिती मिळताच पोलिस ऍक्शन मोड मध्ये आले. लहान मुलाच्या अपहरणाचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठांचे मार्गदर्शनाप्रमाणे अपहरणकर्त्यांचे वर्णन व त्यांनी वापरलेल्या ओमनी कारचे वर्णन प्राप्त करून नाशिक ग्रामीण जिल्हयातील पोलीस ठाण्यांबरोबरच नाशिक शहर, अहमदनगर, ठाणे ग्रामीण, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, पुणे शहर पोलीसांना कळविण्यात आले. अपहरण झालेल्या बालकाचा शोध घेण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. घटनेसंदर्भाने अपहरण झालेल्या मुलाच्या कुटूंबियांची पार्श्वभूमी तसेच अल्पवयीन मुलाच्या दैनंदिन हालचालींची माहिती घेऊन अपहरणाचे व्यापक स्वरूपात सोशल मिडीयावर तसेच विविध प्रसार माध्यमांव्दारे माहिती प्रसारित करण्यात आली. अपहरण बाबत उपलब्ध पुराव्यांचे तांत्रिक विश्लेषणाव्दारे मिळालेल्या माहितीचे आधारे सिन्नर पोलीस ठाणे तसचे स्थानिक गुन्हे शाखेची विविध तपास पथके अपहृत मुलाच्या शोधकामी व आरोपीचे मागावरbरवाना करण्यात आली होती. आरोपींनाही पोलिस आपला मागोवा घेत असल्याची कल्पना झाल्याने तसेच अपहरण झालेल्या मुलाची बातमी व्यापक स्वरूपात सोशल मिडीयावर प्रसारित झाल्याने अपहरणकर्त्यांनी घाबरून जावून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलास रात्री ०१.०० वाजेच्या सुमरास त्याचे राहते घराच्या परिसरात मोटर सायकलवरून आणून सोडून दिले. आरोपीचे मागावर असलेल्या पोलीस पथकांनी आरोपींबाबत माहिती काढून याप्रकारणातील आरोपी रोशन नंदू चव्हाण, वय २३, यश संदिप मोरे, वय २२, दोन्ही रा. कानडी मळा, सिन्नर, ता. सिन्नर यांना पहाटेच्या सुमारास ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली असता, त्यांनी त्यांच्या साथीदाराचे नाव सगितल्याने आकाश भास्कर दराडे, रा. खोपडी, ता. सिन्नर यालाही अटक केली. अपहृत मुलाचे वडील हे सिन्नर शहरातील मोठे व्यापारी असल्याने त्यांच्याकडून भरपूर पैसा उकळता येईल या उद्देशाने त्यांच्या मुलाचे अपहरण केले. आरोपींनी त्यांचा तिसरा साथीदार आकाश दराडे याच्या मार्फतीने फिर्यादी यांच्या १२ वर्षाच्या मुलाच्या दैनंदिन हालचालींवर लक्ष ठेवुन तो खेळण्यासाठी केव्हा बाहेर पडतो याची माहिती घेवुन त्याच्या अपहरणासाठी सायंकाळची वेळ निश्चित केली. ठरल्याप्रमाणे वरील तिन्ही आरोपींनी 05 जानेवारी रोजी सायंकाळी ६.४५ वा. सुमारास नंबरप्लेट नसलेल्या ओमनी कारने फिर्यादी यांच्या घराच्या बाहेर येवुन फिर्यादी यांच्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलगा हा त्याचे इतर मित्रांसोबत गल्लीत खेळत असतांना संधी मिळताच तिघांनी ओमनी कारमध्ये बळजबरीने बसवून पळवून नेले होते. गुन्हयात सहभागी असलेल्या इतर आरोपीच्या शोधावर पोलीस पथके खाना करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
गुन्हयातील आरोपी रोशन नंदु चव्हाण, व २यश संदिप मोरे, दोन्ही रा. कानडी मळा, सिन्नर, ता.सिन्नर, जि.नाशिक यांना अटक करण्यात आली असून त्यांचा साथीदार आकाश भास्कर दराडे, रा. खोपडी, ता. सिन्नर यास नुकतेच संगमनेर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. अपहरण करण्यासाठी यातील आरोपीनी ३४,०००/- रूपये किंमतीची मारुती ओमनी कार सिन्नर येथून खरेदी केली होती. आरोपींनी सुरुवातीस सदर व्यापा-याच्या लहान मुलास पळविण्याचा बेत केला होता परंतू, तो आरडाओरड करेल या भितीने चर्चेअंती त्यांनी तो बेत रद्द करून मोठ्या मुलाचे अपहरण करण्याचे ठरविले. अपहरणाचे गुन्हयाचया तपासाची उल्लेखनीय कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे यांनी केलेले मार्गदर्शनप्रमाणे सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकूळे, सहायक पोलिस निरीक्षक विजय माळी, पोलिस उप निरीक्षक सुदर्शन आवारी, सहायक पोलिस उप निरीक्षक रामदास धुमाळ, हरिश्चंद्र गोसावी, मिलींद इंगळे, रघुनाथ पगारे, शहाजी शिंदे, समाधान बोराडे, राहुल निरगुडे, चेतन मोरे, पंकज देवकाते, हेमंत तांबडे, रविंद्र चिने, पोकों किरण पवार, अंकुश दराडे, कृष्णा कोकाटे, गौरव सानप, सुशिल साळवे तसेच स्थानिक गुन्हें शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक सागर शिंपी, सहायक पोलिस उप निरीक्षक रविंद्र वानखेडे, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम आदींनी केली आहे.
सदर गुन्हयात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.
Great work
God bless u all police