देवळाली गाव ते शिर्डी साई पालखी पद् यात्रेचे आयोजन….
नव वर्षाची सुरुवात भक्तिपूर्ण वातावरणात व्हावी अशी अनेकांची इच्छा असते, चंदू साडे यांनी आयोजित केलेल्या साई पालखी पद यात्रेने नागरिकांची हि इच्छा पूर्ण झाली. नाशिक रोड दत्तनगर सोमवार पेठ देवलालीगाव येथे साई श्रद्धा पालखी सोहळा भव्य दिव्य शाही मिरवणूक आणि पदयात्त्रेचे मोठ्या आनंद उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आली. गेल्या 17 वर्ष पासून साई श्रद्धा पालखी सोहळा पदयात्रा आणि मिरवणूक काढण्यात येते असून दर साला बाद प्रमाणे यंदा याही वर्षी साई श्रद्धा पालखी सोहळा मोठ्या दिमाखात पार पाडण्यात आला. प्रभू श्रीराम,पवनपुत्र हनुमान शिव शंकर भोलेनाथ यांच्या आघोरी देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले हे देखावे नागरिकांना आकर्षणाचे केंद्र होते. जिवंत देखावा पाहण्यासाठी व त्याचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. प्रथमता ह.भ.प. विजय नाथ महराज यांच्या हस्ते पूजन करण्यात आले आणि त्यानंतर चंद्रकांत साडे आणि त्यांची पत्नी खुशबू चंद्रकांत साडे यांच्या हस्ते साई पालखीची आरती करण्यात आली.
रंजन ठाकरे, निवृत्ती महाराज अरिगळे, विक्रम कोठुळे, जगदीश पवार, माजी आमदार योगेश घोलप, केशव पोराजे, रमेश धोगडे, योगेश गाडेकर सूर्यकांत लवटे शशीभाई उनवणे सुमित देसाई किरण राजे भोसले मंगेश लाडंगे सुमित देसाई वैभव खालकर योगेश शेवरे संतोष कांबळे गणेश घनदाट नितीन जाधव सागर जाधव आदी मान्यवर साई पालखी सोहळ्यास उपसथित होते. पालखीचे दर्शन घेऊन पालखी खांद्यावर घेत सर्वांनी साई बाबा की जय चलो बुलावा आया है साईबाबा ने बुलाया है साईनामाचा जयघोष केला. साई पालखी ची देवलगाव ते बिटको चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक डीजे बँड पथक ढोल पथक गाजावाजा करत मिरवणूक व पदयात्रा काढण्यात आली त्यानंतर पद यात्रा पालखी आणि साई भक्त शिर्डीच्या दिशेने रवाना झाले. यावेळी अनेक मित्र परिवाराने देखील उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली . श्री साई श्रद्धा पालखी समितीचे अध्यक्ष व संस्थापक व आयोजक चंद्रकांत साडे, प्रकाश साडे, नंदू साडे यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी परिसरातील नागरिक आणि साईभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते.