नासिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत तर्फे आयोजित सिंधी टॅलेंट शो कार्यक्रम संपन्न.
सिंधी समाजातील कलाकारांच्या गुणांना वाव मिळावा म्हणून नासिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत तर्फे सिंधी टॅलेंट शोचे आयोजन करण्यात आले. सोमवारी 2 जानेवारी रोजी शालिमार येथील कालिदास कलामंदिर येथे हा भव्य सिंधी टॅलेंट शो संपन्न झाले. सर्वप्रथम भगवान झुलेलाल यांच्या प्रतिमेची उपस्थित मान्यवरांनी पूजा केल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 1994 साली स्थापन झालेल्या नासिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत तर्फे अनेक समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असतात.सोमवारी झालेल्या सिंधी टॅलेंट शो मध्ये समाजातील लहान मुलांपासून ते युवक आणि वरिष्ठ कलाकारांनी आपल्या कला गुणांचा उपस्थित प्रेक्षकांसमोर विविध धार्मिक कार्यक्रम, सिंधी भजन, सिंधी स्टँडअप कॉमेडी, सिंधी समाजाचे इतिहास, सिंधी नाटक, सिंधी गाण्यांवर डान्स आणि विविध लोकगीतांचा मनोरंजनाची मेजवानी उपस्थित प्रेक्षकांना मिळाली. कालिदास कला मंदिर प्रेक्षकांनी संपूर्ण भरले होते.
यावेळी प्रेक्षकांनी सिंधी कार्यक्रमांचा भरपूर आनंद घेतले, स्टँड अप कॉमेडी शो द्वारे प्रेक्षकांचे हसून हसून पोट दुखू लागले. यावेळी समाजातील विविध मान्यवरांनी आपल्या परिवारासह कार्यक्रमाचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश गोधानी यांनी केले. यावेळी समाजातील सामाजिक संघटनातर्फे विविध जिल्ह्यातून आलेल्या भाग घेणाऱ्या प्रतिभागीना प्रोत्साहनपर बक्षिसांचे वाटप करण्यात आले. हिक सोन जो रुपये, लाल मिंजी बत्त रख्यो भला, सिंधियन जा मेला, जेके झुलन करे, रख संदली पेर, सुहीणा रस्ता, सिंधी अबानी बोली, लाल झुलेलाल आदी गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सिंधी टॅलेंट शो च्या परीक्षक जज म्हणून दीपा चांग्रानी, कोमल आहुजा, मधु बोधानी यांना नेमण्यात आले होते त्यांनी ठरविलेल्या उत्तम कार्यक्रम केलेल्या तीन प्रतिभागीना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रधान करण्यात आली. कालिदास कलामंदिर मध्ये झालेल्या सिंधी टॅलेंट शो या भव्य कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सिंधी फेडरेशन चे अध्यक्ष उद्धव बोधाणी, उपाध्यक्ष भगवानदास मोटवानी, उपाध्यक्ष मधु बोधाणी, जनरल सेक्रेटरी राजेश गोधानी, जनरल सेक्रेटरी दीपा चांग्राणी, खजिनदार तीर्थ वासवानी, कन्हैयालाल कालानी, नासिक सिंधी पंचायतीचे अध्यक्ष एडवोकेट प्रकाश आहुजा, रितिका भाविषा कलचरल मंच च्या रितिका कालानी, शंकर जयसिंघानी, प्रिया साधवानी, एडवोकेट ज्योती अहुजा, हरीश तलरेजा, वासुदेव लालवानी, हरीश कटारिया, दीपक तोलानी, अमित तानी, मनोहर कारडा, मुकेश वलेचा, संजय फतनानी, नानक केस्वानी, अनिल घ्यानचांदानी, गोविंदराम काच्छेला, अंकिता कटारिया आदींनी परिश्रम घेतले. ब्लू स्टार न्यूज साठी सेवक दर्डा नाशिक.